शहराच्या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिवाळी सणाच्या निमीत्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते सुदेश टॉकीज या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
दिवाळी सना निमित्ताने या रस्त्यावर छोट्या मोठया व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे सणाच्या खरेदी साठी या रस्त्यावर मोठी गर्दी आहे करोना काळात आधीच व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत त्यात या गर्दीच्या रस्त्यावरून अनेक चालक मोठ्या गाड्या,कार घेऊन जातात त्यामुळे छोटे मोठे अपघात व विनाकारण बाचाबाचीचे प्रसंग उद्भवतात तसेच या जड वाहतुकीचा व्यावसायिक व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यातच अनेक ग्राहक मोठ्या गाड्या रस्त्यावर पार्किंग करून खरेदी करतात त्यामुळे विनाकारण नागरिकांना त्रास सहन करावा लागतो रत्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानांच्या समोर त्यांच्या कडे येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या उभ्या केलेल्या असतात
दोन तीन दिवसांपासून छ शिवाजी महाराज स्मारकाच्या जवळ पोलीस नियुक्त केले आहे मात्र वाहतूक बेशिस्त वाहतुकीमुळे पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होतो
गर्दी मुळे ग्राहक या भागात जाण्याची टाळाटाळ करतो तसेच यामुळे मोठी खरेदी करून देखील छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली असताना त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे कोपरगाव तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थे मुळे अनेक ग्राहक ऑनलाईन खरेदीला व जवळच्या तालुक्यात जाऊन खरेदीला पसंती देत आहे मात्र आपल्या शहरातील व्यापारी,व्यावसायिक तसेच तालुक्यातील आर्थिक उलाढाल तालुक्यात व्हावी म्हणून ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी टाळावी व शहरात खरेदी करावी म्हणून देखील नगर पालिकेने ग्राहक व व्यापारी हितासाठी सणासुदीच्या काळात या मुख्य रस्त्यावर ची जड वाहतूक नगर पालिकेने बंद ठेवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी या पत्रकाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *