कोपरगाव तालूका शिवसेनेच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका शिवसेनेच्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल कोपरगाव तालुका शिवसेनेने दिनांक 25 जानेवारी 20 22 रोजी प्रधानमंत्री आवास योजनेत ऑटो डिलीट झालेल्या व समितीने जाचक अटी च्या आधारे अपात्र ठरवलेल्या लाभार्थींचा पात्र यादीत समावेश करावा यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याची दखल घेत मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत संपूर्ण नगर जिल्ह्याची प्रधानमंत्री आवास योजनेतील ऑटो डिलीट झालेल्या,व समितीने अपात्र ठरवलेले लाभार्थींच्या बाबतीत उचित कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने ग्रामविकास मंत्रालयास दिल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख श्री शिवाजी ठाकरे यांनी दिली, काल शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांचे सोबत सविस्तर चर्चा केली,याबाबाबत बोलताना गटविकास अधिकारी श्री सूर्यवंशी यांनी ऑटो डिलीट च्या लाभार्थ्यांची फेरसर्व्हे च्या दृष्टीने ग्रामविकास मंत्री,श्री हसन मुश्रीफ,राज्य मंत्री श्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग बैठक पार पडली असून लवकर च शासन निर्णय होईल असा आशावाद व्यक्त केला असून,जे पात्र यादीत आले परंतु समितीने रिजेक्ट केले त्यांचा सर्व्हे परत करण्यात येईल व त्या लाभार्थी वर अन्याय होणार नाही त्याकरिता स्वतः गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सह 18 जणांची तालुका समिती पुन्हा सर्वे करणार आहे अशी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांना गट विकास अधिकारी यांनी माहिती दिली तसेच घरकुल योजनेतील जाचक अटी दुरुस्त करण्याची या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे विधानसभा कार्याध्यक्ष रावसाहेब थोरात माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव कानडे माजी तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे
शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण जी शिंदे उपतालुकाप्रमुख सर्व श्री सागर फडे ,रंगनाथ गव्हाणे, बाळासाहेब मापारी ,बाळासाहेब राऊत ,राजेंद्रजी नाजगड, संजय दंडवते, राहुल होन , सचिन असणे ,नानाभाऊ डोंगरे, दिपकराव चौधरी, गणेश बरवंट, धर्मा जावळे, पंकज शिंदे, अशोकराव मुरडनर ,विजयराव ताजणे ,नंदू निकम ,विठ्ठल निकम तालुक्यातील अन्याय झाले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *