

कोपरगाव प्रतिनिधी:- येवला रोड कोपरगाव येथे २४ ऑक्टोबर २०२१ रोजी श्री साईबाबा संस्थानला साई TVS कंपनीकडून एक मोटारसायकल, एक स्कूटर व एक सी.एन. जी मालवाहतूक अशा तीन नविन गाड्या देणगी स्वरूपात देण्यात आल्या..
टी.व्हि.एस मोटर्स कडून प्रत्येक नविन मॅाडेल बाजारात सादर करण्या अगोदर ते मॅाडेल साईबाबांना देण्यात येते असे TVS कंपनीच्या इंन्टरनॅशनल बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राहूल नायक यांनी सांगितले, आत्ता पर्यंत १८ वेगवेगळ्या गाड्या TVS मोटर्सने साईबाबा संस्थानला देणगी म्हणून देण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगीतले.



हि वाहने आज साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी श्री रविंद्र ठाकरे साहेब, संस्थानचे वाहन विभाग प्रमुख श्री क्षिरसागर साहेब, श्री कोकणे साहेब त्याच प्रमाणे शिर्डी नगरपंचायतचे प्रथमनगराध्यक्ष श्री कैलास बापू कोते, साई निर्माण उद्योग समूहाचे श्री विजूभाऊ कोते, उपनगराध्यक्ष श्री हरिश्चंद्र कोते, तसेच कोपरगाव येथील साई TVS शोरूमचे संचालक श्री विरेंद्र भंडारकर, TVS मोटर्सचे पुणे येथील श्री मोहंती, श्री बाळासाहेब गाढे, राहुल नायक यांच्या उपस्थित सुपूर्त करण्यात आली.
जय साईनाथ !!
