
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच असून त्या निषेधार्थ उद्या (दि.२०) रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर व शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून इंधनाचे दर नवनवीन विक्रम गाठीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत असून स्वयंपाकाच्या गॅसचे दर देखील गगनाला भिडले असून महिला भगिनींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. मात्र याबाबत केंद्र सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. सर्वसामान्य नागरिकांना होत असललेल्या त्रासाची केंद्र सरकारला काहीच देण घेण नाही. त्या निषेधार्थ केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी उद्या (दि.२०) रोजी सकाळी १०.०० वाजता कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सायकल रॅली काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
