
कोपरगाव प्रतिनिधी:- पोहेगाव येथे माजी आमदार श्री. दादासाहेब शहाजी रोहमारे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा स्थलांतर व उदघाटन सोहळा माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष, आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडला.



यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोपरगाव एज्युएकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकराव रोहमारे, श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त अविनाशजी दंडवते, संस्थेच्या चेअरमन क्रांतीताई रोहमारे, सोसायटीच्या चेअरमन शकुंतलाताई रोहमारे, जयंतराव रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिनजी रोहमारे, सुनीलजी शिंदे, आनंदराव चव्हाण, सूर्यभानजी कोळपे, राजेंद्रजी घुमरे, संजयजी रामराव रोहमारे, सहकारी संस्था सहाय्यक निबंधक एन.जी. ठोंबळ, पंचायत समिती सदस्य अनिलजी कदम, रोहिदासजी होन, राहुलजी रोहमारे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
