अजून किती सहकार्य करायचे?:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील स्लॉटर हाऊसला (कत्तलखाना) प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळविण्यासाठी मी स्वतः कसाई-कुरेशी समाजाचे शिष्टमंडळासह अहमदनगर कार्यालयात गेलो, प्रयत्नपूर्वक मान्यताही मिळविली. सुमारे 1 कोटी रूपये खर्च करून बांधून पडलेले स्लॉटर हाऊस दुरुस्त करून घेतले, मशिनरी सुरू करून घेतल्या, रंगरंगोटी – स्वच्छता करून फक्त म्हैसवर्गीय जनावरांचे स्लॉटर हाऊस सुरू करून दिले. सर्वच नगरसेवकांच्या संमतीने संजयनगर भागात त्यांना मटन विक्रीसाठी जागाही उपलब्ध करून देण्यात आली. पण गोवंश हत्याबंदी असतांनाही बहुतांश कसाई मात्र संजयनगर परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशहत्या करून संपुर्ण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. त्यांना कायद्याशी व हिंदू समाजाच्या भावनांशी काहीच देणेघेणे नाही.
संबंधित कसाई वर्गाला मी जाहीरपणे सांगतो कि, मनाई येथील म्हैसवर्गीय जनावरांच्या स्लॉटर हाऊसचा नियमितपणे वापर करा. तेथे अजून काही आवश्यक सुविधा पाहिजे असतील तर त्याही करून देण्यात येतील. पण कुठल्याही परिस्थितीत गोवंशहत्या सहन केली जाणार नाही. यानिमित्ताने काहीजण अर्धवट माहितीवर व्‍हॉट्सअपवर मेसेज टाकून माझ्याबद्दल गरळ ओकत आहेत.
मी नगराध्यक्ष झाल्यापासून केलेल्या कामांची पुस्तिका लवकरच प्रसिद्ध करणार आहे. पुस्तिका वाचल्यानंतर भंपकपणे बोलणारे अर्धवटराव नक्कीच शांत होतील यात शंकाच नाही. मी कुणाचाही धर्म-पक्ष पाहून कारभार केलेला नसून शहराच्या हितासाठीच काम केलेले आहे.
उदा.- संत ज्ञानेश्वर संकुलातील तळ मजल्यात व्यवसाय करणाऱ्या बांगडी व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावरून दिसतच नसल्याने त्यांचा धंदाच होत नव्हता. त्यांना पायऱ्या बांधण्याची परवानगी देऊन त्यांची अनेक वर्षांची अडचण दुर करण्यात आली. मी तरी सार्वजनिक काम करत असताना भेदभाव करत नाही. मी भेदभाव करत असेल असे काहींना वाटत असेल तर त्यांनी तीनही मुस्लिम नगरसेवकांशी बोलून खात्री करून घ्यावी. भेदभाव करायचा नाही व कुणाचे फालतू लाडही करणार नाही, हे चुकीचे-बेकायदा काम करणाऱ्यानी लक्षात घेणे सर्वांच्याच हिताचे होईल. शहरातील सर्वसामान्य कष्टकरी हिंदु-मुस्लिम समाजात सलोखा आहे. पण कुणी गोहत्या करून भावना दुखविणार असतील-तालिबानीबद्दल ज्यांना कळवळा असेल त्यांनी आता भानावर येण्याची गरज आहे. यापूर्वी कोपरगाव शहरात दिवंगत हबीबभाई मणियार, करीमभाई कुरेशी इ.नी शहरात धार्मिक सलोखा राहिल असेच कार्य केले. आताच्या अर्धवटरावांनी इतिहास समजून घेतला तर सर्वांच्याच हिताचे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *