नागेबाबा उद्योग समूहाला कोरोना योद्धा सन्मान तथा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार जाहीर:- संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- जाणीव सांस्कृतिक अभियान संस्था या राष्ट्रीय उपक्रमशील संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय प्रशासकीय तथा आरोग्य कृषी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना सामाजिक कृतज्ञता म्हणून करुणा युद्ध सन्मान तथा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार २०१ ९ -२० हा नुकताच नागेबाबा उद्योग समूह अहमदनगर यांना जाहीर झाला आहे . या पुरस्काराचे वितरण रविवार २६ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होत आहे प्रसंगी सन्मा . ना . दादासाहेब भुसे साहेब ( कृषी मंत्री , महाराष्ट्र राज्य ) , सन्मा . इतिहासाचार्य डॉक्टर स्मिता देशमुख “ राजमाता जिजाऊ पहिल्या ऐतिहासिक मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत ) व सन्मा . खा . हेमचंदजी गोडसे ( खासदार , नाशिक लोकसभा ) कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा . आ . डॉ . सुधीरजी तांबे आमदार नाशिक पदवीधर मतदारसंघ आदी मान्यवर उपस्थित असणार आहे कोरोना काळामध्ये अहमदनगर येथे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये मोफत जेवण व सोबत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना एक प्रेरणादायी पुस्तक देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच श्री क्षेत्र भेंडा येथे सरकारी कोविड सेंटरला जागा उपलब्ध करून तेथे अन्नधान्याची व्यवस्था दररोज सकाळी सूक्ष्म व्यायाम व सायंकाळी सकारात्मक विचाराचे आयोजन करून देण्यात आले , आजही रुग्ण याचा लाभ घेत आहे .

समाजातील सर्व घटकांसाठी नागेबाबा सुरक्षा कवच या योजनेअंतर्गत फक्त ३०० रुपये मध्ये १० लाखाचा अपघाती विमा व अपघातानंतर उपचारासाठी ५ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत करून देण्यात आलेली आहे . कोविंड काळामध्ये नागेबाबा मल्टीस्टेट ने सभासदांना हॉस्पिटल बिल भरण्यासाठी वेळी – अवेळी सोने तारण कर्ज उपलब्ध करून देऊन हॉस्पिटलमध्ये पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे , नागेबाबा हाऊस अहमदनगर येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासणी 50 % सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . सर्वांना वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता प्रेरणादायी पुस्तक फक्त 70 रुपयांमध्ये सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे . आरोग्य मित्र यांच्या सहकार्याने लोकांना त्यांच्या हॉस्पिटल बिलामध्ये सवलत मिळवून देण्याचे काम केले जाते तसेच लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व दररोज ऑनलाईन व्यायाम घेतले जातात . पर्यावरणाचे रक्षण व्हावे याकरिता संस्थेने नागेबाबा वृक्षमित्र पुरस्कार जाहीर केलेला आहे सभासदांनी त्यांच्या घरी झाडे लावून ते १ वर्ष जतन पालन – पोषण करील अशा सभासदांना नागेबाबा वृक्षमित्र पुरस्कार जाहीर केलेला आहे या आणि अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपण समाजाचे काही प्रमाणात देणे लागतो या उद्देशाने नागेबाबा उद्योग समूह काम करत आहे . जाणीव सांस्कृतिक अभियान ही संस्था नाशिक , अहमदनगर , जळगाव , धुळे , नंदुरबार , औरंगाबाद , पुणे , ठाणे , बीड आदी विभागात अग्रगण्य व नामांकित जाणीव सांस्कृतिक अभियान व शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अधिक क्षेत्रात कार्यरत आहे संस्थेच्यावतीने व्यक्तिमत्व विकास शिबिर , उद्योजकता मार्गदर्शन शिबिर , ब्लड कॅम्प , संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर , वृक्षारोपण स्पर्धा परीक्षा , मार्गदर्शन व्याख्याने आदींचे आयोजन तसेच विधवा व निराधार महिलांना संवादकीय मार्गदर्शन व प्रसंगी मदतही सभासदांच्या यथाशक्ती योगदान आतून सातत्याने काम केले जाते त्यांचे नैतिक धैर्य उंचावरून त्यांना प्रवाहा बरोबर जीवन जगण्यासाठी धीर देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे समाजाभिमुख कार्य व्यवस्थापक स्वरूपात करण्याचे संस्थेचे धोरण आहे या सामाजिक उपक्रमातील एक भाग म्हणून राज्यातील निवडक गुणीजनांचा सत्कार संस्था राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करते सद्यपरिस्थितीत कोरणा काळात सामाजिक जाणिवेतून अनेकांनी आपल्या स्तरावर मोलाची कामगिरी केली आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे याकरिता संस्था कार्यरत आहे . तसेच या अगोदर जाणीव संस्थेने पद्मश्री पोपटराव पवार , एसपी कृष्णप्रकाश , सिंधुताई सपकाळ , पद्मश्री शीतल महाजन आदींना या अगोदर पुरस्कृत केलेले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *