
कोपरगाव प्रतिनिधी:-
सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन “जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव” हे जग बदलाचे स्वप्न पाहिले होते त्यांचे आधुरे स्वप्न साकार व्हावे म्हणून समाज बांधवांनी प्रयत्न करावे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हमाल पंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगर सेवक सोमनाथ म्हस्के यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब शेळके हे होते
या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून उभी केलेली नायक,नायिका हे प्रस्थपित व्यवस्थेशी टक्कर देणारे असून कारखानदार,भांडवलदार यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे होते त्यामुळे त्यानी आपली फकिरा ही जगप्रसिद्ध कादंबरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला म्हणजेच विचारणा अर्पित केली असून त्यातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारातून सर्व सामान्य पीडित वंचित घटकांना परिवर्तनाचे संदेश देणारे विचार मांडले मात्र अजूनही अण्णा भाऊ साठे यांचे जग बदलाचे अर्थात परिवतनाचे स्वप्न साकार झाले नाही
यावेळी विनोद राक्षे,राजेंद्र बागुल,बलभीम उल्हारे अकबर शेख आदींनी आपले विचार मांडले
तर कार्यक्रमास बाजार समीतीचे सचिव रनशूर साहेब आबा कदम,शरद त्रिभुवन,अनिल मरसाळे,रवी शेलार किरण आढागंळे,सुजल चंदनशिव निसार शेख नितीन मरसाळे,संदीप निरभवने,व हमाल पंचायतीचे अनेक सदस्य हजर होते
