Uncategorized

श्री.शुक्राचार्य मंदिर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन…

४ ते १० ऑक्टोबर दरम्यान गणेश बुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून रंगणार भक्तिरसाचा सोहळा…
कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव तालुक्यातील बेट येथील परम सद्गुरू शुक्राचार्य मंदिर येथे सलग तिसऱ्या वर्षी श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सौ. सरोजिनी बाळासाहेब आव्हाड यांच्या वतीने आयोजित हा धार्मिक सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर ते शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भागवताचार्य श्री. गणेशबुवा लोहोणेरकर महाराज यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेचे निरूपण होणार आहे.

या भागवत सप्ताहात सात दिवस विविध धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर निरूपण केले जाणार आहे. भगवान श्रीकृष्णांचे जीवनचरित्र, विविध अवतार, भक्तांची चरित्रे, श्रीकृष्ण जन्मोत्सव, रुक्मिणी विवाह आणि सुदामा चरित्र अशा विविध प्रसंगांतून भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि जीवनमूल्यांची शिकवण मिळणार आहे.

शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सप्ताहात भागवत महात्म्य, कपिल परीक्षित जन्म, शुकदेव आगमन, ध्रुव चरित्र, प्रल्हाद चरित्र, नृसिंह अवतार, वामनावतार, रामावतार, श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोवर्धन पूजा, रुक्मिणी विवाह आणि सुदामा चरित्र आदी विषयांचे निरूपण होणार आहे. शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी कथा विश्रामाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या भागवत सप्ताहामुळे बेट व पंचक्रोशीतील भाविकांना आध्यात्मिक पर्वणी मिळणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *