श्रीमंत पवार सरकार संस्थानचे महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान ,जुने गावठाण, सराफ बाजार, कोपरगाव येथील सोमेश्वर महादेव देवस्थान, बेट येथील श्रीमंत महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात सडा,रांगोळी करुन उस,गोवरीने,फुलांची सजावट करुन पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक होळी सजविण्यात आली. मंत्रोच्चार आणि विधवत पुजन करत होळीचे दहन करण्यात आले. तसेच श्रीमंत महामहिम पवार सरकार संस्थानचा देवास ज्युनिअर रियासत चे माध्यमातून कोपरगांव आणि जेऊर कुंभारीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहिम यशवंतराव पवार सरकार यांची १२१ व्या जयंती निमित्ताने त्यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.
श्रीमंत पवार सरकार संस्थानचे श्रीमंत महादेव देवस्थान बेट-कोपरगाव, गंगेश्वर महादेव देवस्थान, जेऊर कुंभारी येथेही होळी उत्सव साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख सौ.संगिताताई व महेंद्र (बाळासाहेब) पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, पौरोहित्य नंदू शेंडे(गुरव), प्रशांत जंगम, अजय जंगम, जयंत विसपुते, कुमुदिनी कुलकर्णी, संदीप जोशी, सोमेश्वर महादेव भक्त मंडळाचे सदस्य, श्रीमंत महादेव देवस्थान बेटचे गुरव विजय वाघमारे(गुरव), प्रमोद नरोडे, सोनवणे, आव्हाड, नाईकवाडे, परदेशी, कहार, गंगेश्वर महादेव देवस्थानचे भक्त वक्ते, लिंबोरे, चंद्रकांत जोर्वेकर यांचे सह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *