
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- निवडणुकीच्या वेळी अनेक राजकीय नेते नागरिकांवर आश्वासनांची खैरात करीत असतात मात्र निवडणुका संपल्यावर निवडणून आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांचा राजकीय नेत्यांना विसर पडत असतो. मात्र आमदार आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची आमदार आशुतोष काळे पूर्तता करीत असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे अपक्ष नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात सय्यद यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेला विकास मागील पाच वर्षात झाला नसल्यामुळे विकासाचा अनुशेष मोठा होता. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न व त्यामुळे कोपगावची बाजारपेठ उध्वस्त झाली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यासह शहरातील नागरिकांना माफक आश्वासन दिली होती. यामध्ये कोपरगाव शहराच्या नागरिकांचा विशेषत: महिला भगिनींचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न असेल, शहरातील रस्ते, वीज, अमरधामचे प्रश्न तसेच सुशोभीकरणाचे प्रश्न असतील हे प्रश्न दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मार्गी लावण्यात आमदार आशुतोष काळे यांना यश मिळाले आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करतांना त्यांनी निवडून येताच तीनच महिन्यात पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम सुरु करून प्राथमिक स्वरूपातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जे मागील लोकप्रतिनिधींना जमले नाही ते त्यांनी करून दाखविले आहे. पुढील काम सुरु करण्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु असून त्यांची धडपड पाहता लवकरच निधी प्राप्त होवून पुढील कामास सुरुवात होईल असा प्रत्येक शहरवासियांना विश्वास आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. मुस्लीम समाजाला देखील त्यांनी कोपरगाव शहरातील कब्रस्तान व मस्जिदच्या अंतर्गत विकासासाठी निधी देण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी शहरातील नूर इस्लाम मस्जिद (मर्कज), नवीन कब्रस्तान (१०५), जुना कब्रस्तान (मौलवी गंज) कोर्ट रोड व मदरसा मिफ्ता उल उलुम (खडकी) साठी भरीव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाची मोठी अडचण दूर होणार आहे कोपरगाव शहाराप्रमाणे ग्रामीण भागातील देखील सर्वच कब्रस्तान व मस्जिदचा आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून विकास होणार आहे याचा मला विश्वास आहे. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटाचा यशस्वी मुकाबला करत नागरिकांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या उपाय योजना करून कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील मतदार संघासाठी आमदार आशुतोष काळे यांनी एवढा निधी आणला जर कोरोनाचे संकट नसते तर कोपरगाव शहरासह मतदार संघात नक्कीच यापेक्षा अधिक विकासकामे झाली असती असे हाजीमेहमूद सय्यद यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले असून आमदार आशुतोष काळे यांचे सर्व मुस्लीम समाजाच्या वतीने आभार मानले आहे.
