डॉक्टर गौरव वर्मा यांचा “गौरव” :- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव पंचक्रोशी प्रसिद्ध असलेले डॉ.दत्तात्रय मुळे व डॉ.संकेत मुळे यांचे प्रसिद्ध असणारे “मुळे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोपरगाव” यामुळे कोपरगावकरांना परिचित झालेले एस.एम.बी.टी हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.गौरवजी वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप बहाल करण्यात आले.
ही प्रतिष्ठित फेलोशिप ए.सी.एल लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आली.
तेथे इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अँटोनियो कोलंबो तसेच झुरीच (स्वित्झर्लंड) येथील नामांकित तज्ञ डॉ.बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ.वर्मा यांचा सन्मान करण्यात आला.
कोपरगाव परिसरात याबद्दल असंख्य रुग्णांना आनंद झाला. व सर्वत्र त्यांच्या अभिनंदन होत आहे.
घोटी (नाशिक) येथील सुप्रसिद्ध (एस.एम.बी.टी_श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात) येथे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानाचे स्थान आहे. उत्तर महाराष्ट्रात एस. एम. बी.टी सर्वात मोठे हॉस्पिटल समजले जाते. हृदयरोग तज्ञ करता लागणारी मोठी टीम या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. शिवाय हृदयरोग स्वतंत्र विभाग येथे उपलब्ध आहे. एन्जोप्लास्टी किंवा बायपास ला लागणारा प्रचंड खर्च या हॉस्पिटलमध्ये येत नाही. शासनाच्या सर्व प्रकारच्या सवलती येथे उपलब्ध आहे.
या जागतिक गौरवामुळे डॉक्टर वर्मा यांचा गौरव आणखीनच वाढला आहे. मुळे मल्टी हॉस्पिटल कोपरगावकरांचा मान व अभिमान आहे. वैद्यकीय सेवेतील समर्पण त्याग व संशोधन व हातोटी यामुळे डॉक्टर वर्मा अल्पावधीचा लोकप्रिय झाले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल इंजिनीयर व बिल्डर) श्री.माधवराव देशमुख साहेब, उद्योगपती श्री.कांतीलाल मनोजशेठ अग्रवाल,श्री.योगेशजी जोबनपुत्रा व मी नारायण अग्रवाल चा परिवार तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध अर्थो डॉ.मुकेश जी अग्रवाल यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन…..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *