
कोपरगाव प्रतिनिधी :-
सर्वांना अत्यंत आनंद होत आहे की, विदर्भरत्न, वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार, परमपूज्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतमय वाणीतून तुलसी रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलमय सोहळ्याला आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून तुलसी रामायण श्रवणाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
स्थळ: विष्णु गेट, साकरवाडी
दिनांक: बुधवार दि. २७.०८.२०२५ ते सोमवार दि. ०१.०९.२०२५.
काल्याचे किर्तन मंगळवार दि. ०२.०९.२०२५ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.
वेळ: सायं. ०७.३० ते १०.३०
निमंत्रक:
सुहासजी गोडगे अध्यक्ष, प्रवीण विभुते उपाध्यक्ष, सर्व अधिकारी, कामगार व ठेकेदार,
गोदावरी बायोरिफायनरीज लि. संचलित श्री. गणेशोत्सव मंडळ, साकरवाडी.
