हुरळून जाऊ नका:- विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या फक्त 69 आहे,अशा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून
काही वेळा रुग्णांचा आकडा 200 ते 250 पर्यंत होता.पण आज अचानक आकडा 69 वर आल्यामुळे आपण हुरळून जाऊ नये.खरे तर सध्या टेस्टिंग किट उपलब्ध होत नसल्याने दोन दिवस टेस्ट न केल्याने आज रुग्ण संख्या कमी झालेली दिसते.दोन दिवसांपासून टेस्टिंग किटच नव्हत्या.
कोपरगावला दि.8 मे पर्यंत जनता संचारबंदी आहे.आज रुग्णसंख्या कमी झाल्याची बातमी वाचून आपण कुणीही बेसावध राहून चालणार नाही.आज इंजेक्शन व ऑक्सिजनचाही तुटवडा असल्याने भयानक दुरवस्था झालेली आहे.ऑक्सिजन बेडही नाहीत.नागरिकांना नम्र विनंती करतो कि, “घरात रहा-सुरक्षित रहा”. प्रशासनास सहकार्य करा.घरात कोरोनाची लक्षणे असणारी व्यक्ती असल्यास त्वरित कोविड सेंटरशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *