वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम यशस्वी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील वारी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असुन आरोग्य अधिकारी डॉ पाखरे ,डॉ बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध रीतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वारीचा सर्व स्टाफ ,सर्व आशा सेविकांच्या मदतीने उत्तम प्रकारे नियोजन करून कोविशिल्ड लस देण्यात येत आहे
कोपरगाव तालुक्यात कोरोना साथीने थैमान घातले असुन आरोग्य अधिकारी व कर्मचारी साथ आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत रूग्ण शोधुन उपचारासाठी पाठविले जात आहेत तसेच जनजागृती करून मोठ्या प्रमानात लसीकरण मोहीम सुरु आहे
वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम बाहेरच नोंदणी करुन गर्दी होऊ नये यासाठी प्रा आ केंद्राचा स्टाफ प्रयत्न करतात सामाजिक अंतर पाळत योग्य नियोजन करून याठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे सरपंच सतिशभाऊ कानडे यांनी सांगितले व ४५ वयाच्या पुढील सर्वांनी लसीकरण करुन घेऊन या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे या कठीण काळात आरोग्य कर्मचारी करीत असलेल्या नियोजन बध्द कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे


आज अखेर वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, पंचायत समिती सदस्य मधुकरराव टेके, माजी पंचायत समिती सभापती मच्छिंद्र टेके, माजी सरपंच रावसाहेब टेके, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे ,कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजीराजे ठाकरे, राजेंद्र वाळुंज, तान्हाजी थोरमिशे ,बाबासाहेब शिंदे ,पत्रकार रोहीत टेके फकीर टेके, जनार्धन जगताप तसेच संजय समरीत, अनिल दवणे, कैलासराव सातपुते सर, वीरभद्र विद्यालय धोत्रा, रामेश्वर विद्यालय वारीचा स्टाफ ,दि गोदावरी बायोरिफायणरी लिमिटेड साकरवाडीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिसरातील वारी साकरवाडी ,धोत्रा, भोजडे,खोपडी, सडे, शिंगवे येथील असंख्य नागरिकांनी ही लस घेतली असुन बुधवारी १४ एप्रिल रोजी उच्चांक नोंदवत १२७ च्या वर नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे आरोग्य अधिकारी , नर्स ,आशा सेविका व सर्व स्टाफ करीत असलेल्या योग्य नियोजनाबद्दल सर्वपक्षीय ग्रामस्थ पदाधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *