आ.आशुतोष काळेंच्या हस्ते मदतीचा धनादेश प्रदान..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील श्रीमती रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कुटुंब कल्याण योजनेचा २०,०००/- रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील देर्डे येथील रहिवासी असलेले राजेंद्र शिलेदार यांचे मागील वर्षी निधन झाले होते. मयत राजेंद्र शिलेदार हे त्यांच्या कुटुंबात एकमेव कमावते व्यक्ती होते. उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे श्रीमती शिलेदार यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. त्यांचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्यामुळे श्रीमती रत्नमाला राजेंद्र शिलेदार यांनी सामाजिक अर्थ सहाय्य योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेतून आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत श्रीमती शिलेदार यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या प्रयत्नातून श्रीमती शिलेदार यांना २०,०००/- ची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती. या मदतीचा धनादेश नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पतीच्या निधनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या मदतीतून आर्थिक अडचण दूर होणार असल्यामुळे श्रीमती रत्नमाला शिलेदार यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी श्रीमती रत्नमाला शिलेदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून श्रीमती एस. टी.गोंदके, केशव विघे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :-
राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजनेच्या मदतीचा लाभार्थी महिलेस धनादेश प्रदान करतांना आमदार आशुतोष काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *