नाशिक येथे टोमॅटो उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या भेटी व मार्गदर्शन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक या भागातील प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये वनस्पतीरोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख तथा हॉर्टसॅप प्रकल्प प्रमुख डॉ. आण्णासाहेब नवले, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्राचे संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे, पाटोदा येथील कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी श्री. एकनाथ बडाख, कृषि पर्यवेक्षक श्रीमती. शबाना अत्तार, श्री एन. टी. गायकवाड, कृषि सहाय्यक श्री. देशमाने हे उपस्थित होते. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन टोमॅटो उत्पादक शेतकर्यांबरोबर सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन टोमॅटो पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकर्यांना टोमॅटो पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाहणी केल्यानंतर टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या अनुषंगाने एकात्मिक किड नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., नवी दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीक सरंक्षण सल्ला दिला जातो. भेटीवेळी शेतकर्यांना विद्यापीठामार्फत तयार केलेल्या अडवायसरी देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय कोळसे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *