राष्ट्रपती नामदार द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नासिक चे यशकुमार काले यांचा अल्पवयात यश गौरव:- नारायण अग्रवाल….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार स्व.सी.बी.गंगवाल नातु आणि नासिक जिल्हा परिषद माजी सदस्य महेंद्र काले ( अंदरसूल ) नातू यांचे महाराष्ट्र राज्य जीएसटी तथा विक्रीकर
न्यायाधिकरणाचे सदस्य, जैन समाज मांगीतुंगी तीर्थक्षेत्र समिती अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अप्पर राज्य कर माजी आयुक्त सुमेरकुमार काले ( एस. पी. )तथा गजपंथा सिध्द‌‌‌क्षेत्र महामंत्री सौ सुवर्णा काले यांचे पुत्र यश कुमार काले ( ,आय.एफ. एस. ) यांना, मागील आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन-अकादमीच्या वतीने, डेहराडून येथे संपन्न झालेल्या, दीक्षांत समारंभात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते “सर्वोत्कृष्ट संवाद व वक्तृत्व कौशल्य” श्रेणीमधील सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये
“प्रथम पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
यश कुमार यांचे वर बालपणी सर्वोत्तम धार्मिक , सामाजिक , उच्च शैक्षणिक संस्कार काले आणि गंगवाल कुटुंबियांनी घडविले.
यश कुमार हे कोपरगांव चे जेष्ठ पत्रकार स्व सी. बी. गंगवाल यांचे लाडके नातू असल्याने ते त्यांच्या अंगा खांद्यांवर खेळत असल्याने बालपणात सी.बी. गंगवाल यांनी यशकुमार यांना दुधावरील सायी प्रमाणे आत्मीयतेने सांभाळले . आज त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला असता तर काले – गंगवाल कुटुंबियांच्या नव्हे तर सर्व मित्रपरिवारांचे आनंदारुपी दुधात निश्चितच साखर पडली असती .
यशकुमार यांनीआपल्या बालपणात संत, महात्मेआदीं यांचे चरित्र विविध विषयांवरील वाचन केले . यावर आपणही महात्म्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सतत जनसंपर्कातून जनसंवाद करुन समाज ,देश सेवा करू या जिद्दीने पेटलेले यशकुमार प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयात मित्रपरिवार वाढवितांना वकृत्व कौशल्य , संघटना, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक, खेळ क्षेत्रात यशवंत बनले. त्यामुळे आम्हा सर्वांचेच लाडके आहे.
यश कुमार यांनी आमचा विश्वास केंद्रीय यूपीएससी २०२२ च्या परीक्षेत भारतात २२ वे तर महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावून सार्थ ठरविला.
यानंतर केंद्र सरकारच्या १६ महिन्यांचे खडतर व कसोटी पहातांना घाम गाळून घेणारे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय शासनाच्या वन आणि वन्यजीव संरक्षण खात्यात यशकुमार रुजू झाले. मुळातच निसर्ग आवड आणि संपूर्ण जीवनात कायम आव्हाने सतत झेलण्याचा अंगभूत गुणधर्म रोमारोमात भिनला असल्याने या क्षेत्रात फार कमी युवक जातात ह्यांचे भान ठेवूनही यशकुमार या सेवेत दाखल झाले. येथेही ते रमले
यश कुमार काले यांचे अद्वितीय यश संपूर्ण कोपरगांव वासिय,
त्याचप्रमाणे आमच्या अहमदनगर-नाशिक सहमित्र परिवारासह
यश कुमारचे मामा जितेंद्रजी गंगवाल (कोपरगांव ) , सुदेश पाटणी ( शिर्डी ) , श्रीरामपूर जैन समाज अध्यक्ष व पत्रकार अनिल पांडे यांचे भाचे तसेच विरेश अग्रवाल, योगेश जोबन पुत्रा, आदींसाठी
यश कुमार यांचे अद्वितीय यश परंपरा निश्चितच भूषणावह आहे.
अशा कर्तृत्वशाली यशकुमार काले यांचे व काले कुटुंबियांचे त्रिवार अभिनंदन!!!
तसेच यशकुमार व काले कुटुंबियांकडून अशीच समाज आणि देश सेवा घडविण्यासाठी ईश्वर सर्वांना भावी दिर्घायुष्य कायमस्वरूपी उत्तम आरोग्य सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! नारायण अग्रवाल, जेष्ठ व्यापारी कोपरगांव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *