
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रमाचा समारोप
कोपरगाव प्रतिनिधी:- जीवाची बाजी लावून देशाच्या सीमेवर लढणारे व देशवासियांचे संरक्षण करणारे सैनिक हेच समाजाचे खरे हिरो आहेत. भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना आपल्या मागे कुटुंबाची काळजी घ्यायला लाखो-करोडो बांधव आहेत, अशी सुरक्षिततेची भावना आपण सैनिकांमध्ये निर्माण करायला हवी. सैनिकांच्या त्यागाची, बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मान-सन्मान देणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. सैनिक देशासाठी लढत असले तरी देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे आपल्या कार्यातून देशसेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील व आसपासच्या परिसरातील अधिकाधिक युवक सैन्य दलात भरती होण्यासाठी कोपरगाव येथे लवकरच एक अकॅडमी स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणारे सैनिक रक्षाबंधन सणासाठी आपल्या गावी येऊ शकत नाहीत. त्यामुळे सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवून त्यांच्याप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा समारोप मंगळवारी (५ सप्टेंबर) येवला रोडवरील मशाल चौकात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या ह्रदयस्पर्शी सोहळ्यात युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, न. प. तील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, विजय आढाव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्निल निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, सुनील देवकर, सद्दामभाई सय्यद, खालिकभाई कुरेशी, आकाश वाजे आदींच्या हस्ते माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे, उपाध्यक्ष मारुती कोपरे, सहसचिव सचिन चोळके, मधुकर इनामके, छबुलाल पवार, रवींद्र आचारी, विजय वाघ, नानासाहेब गाडेकर, अमित राजपूत, विक्रम सोनावणे, सागर शेंडगे, नितीन ढोमसे, किशोर जगताप, अनंत डिके, किशोर जऱ्हाड, पंकज झावरे, इरफान शेख, सुधाकर जाधव, विजय जाधव, राजू कदम, विजय कदम, विठ्ठल टुपके, तुकाराम रणशूर, राजेंद्र धुमाळ तसेच शिक्षक दिनानिमित्त श्वेतांबरी राऊत, चंदनशिव, श्रीमती शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात माजी सैनिकांना एसएसजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या.

माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष युवराज गांगवे व उपाध्यक्ष मारुती कोपरे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून विवेकभैय्या कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक केले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी दूरदृष्टी ठेवून कोपरगावात संजीवनी सैनिक स्कूल व प्रि-कॅडेट ट्रेनिंग सेंटर सुरू केल्याने या भागातील शेतकऱ्यांची व सर्वसामान्य कुटुंबातील हजारो तरुणांना सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक सिद्धार्थ साठे तर आभार प्रदर्शन अनुराग येवले यांनी केले. प्रारंभी अमर जवान स्मृतिचिन्ह, भारतमाता व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन, कृषी, आरोग्य हे पाच उद्दिष्ट घेऊन ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीद्वाक्यानुसार नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जातात. हे सेवाकार्य अखंडपणे सुरू असून, इतर विविध समाजोपयोगी उपक्रमही प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात. अन्नदाता शेतकरी व देशरक्षणासाठी लढणारे सैनिक यांच्याबद्दल आपण सदैव आदरभाव बाळगला पाहिजे. आपले सैनिक २४ तास डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. सैनिकांना दिवाळी, दसरा, रक्षाबंधन असा कोणताही सण, उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्यामुळे सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व तरुण पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाला कोपरगाव तालुक्यासह राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, जवानांना पाठविण्यासाठी माता-भगिनींनी १५ हजारांवर राख्या प्रतिष्ठानकडे जमा केल्या आहेत. आम्ही या सर्व राख्या आणि आपले संदेश राजस्थानातील जैसलमैर सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम कोपरगाव तालुक्यापुरता मर्यादित न राहता तो देशव्यापी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. सैनिकांना दिवाळी, दसरा, रक्षाबंधन असा कोणताही सण, उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्यामुळे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी सण साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी कालूअप्पा आव्हाड, दीपक जपे, वैभव आढाव, गोपीनाथ गायकवाड, सुनील देवकर, दीपक चौधरी, सोमनाथ म्हस्के, सुशांत खैरे, रवींद्र रोहमारे, जयेश बडवे, विवेक सोनवणे, सतीश रानोडे, सचिन सावंत, प्रसाद आढाव, फकिर मोहम्मद पहिलवान, महेश खडामकर, रवींद्र लचुरे, अनिल जाधव, स्वप्निल मंजुळ, देवीदास रोठे, विक्रांत सोनवणे, दत्ता कोळपकर, जयप्रकाश आव्हाड, रुपेश सिनगर, स्वराज सूर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, विजय गायकवाड, विजय शिंगाडे, समीर सुपेकर, सिध्दांत सोनवणे, अण्णा खरोटे, शंकर बिऱ्हाडे, गोरख देवडे, शाहरुख मणियार, रोहित कनगरे, प्रमोद सिनगर, राजेंद्र गंगुले, किरण आव्हाड, बापू कुमावत, किरण वाघ, राजेंद्र चांडे, कैलास संवत्सरकर, विशाल गोर्डे, ऋषी कदम, पंकज कुऱ्हे, गणेश राऊत, अनुराग येवले, किशोर दरेकर, राहुल वाणी, विजय साळुंके, नाजिम शेख, राहुल आढाव, राजू शेलार, योगेश वाघ, रितेश परजणे, विलास भाकरे, प्रमोद संवत्सरकर, शेखर कुऱ्हे, बालासाहेब आहिरे, सुनील चव्हाण, अमोल वराडे, अजित जाधव, सतीश निकम, मनोज इंगळे, मनोज तुपे, गणेश थोरात, प्रभाकर पारखे, किरण गायकवाड, रमाकांत वाकचौरे, गणेश शिंदे आदींसह आजी-माजी सैनिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
