गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथील अधिकार्‍यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- श्री गणेश चतुर्थीला ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंतचतुर्दशीला गुरुवारी(ता. १८) गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली होती. गणेश उत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सर्व गणेश भक्तांनी उत्साहात व शांततेत गणरायांना निरोप दिला.
कोपरगाव तालुक्यातील वारी या गावाचा इतिहास सांगणारे आणि वारीच्या सौंदर्याचा मुख्य भाग असणारी गोदावरी नदीकाठ गतवर्षीप्रमाणे यावर्षी मूर्ती विसर्जनातून होणाऱ्या प्रदूषणापासून बचावले आहे. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडीचे डायरेक्टर श्री. सुहास गोडगे यांच्या संकल्पनेतून सर्व अधिकारी वर्गाने स्वयंप्रेरणेने परिश्रम घेऊन नदीकाठी विसर्जित झालेल्या सर्व गणेश मूर्तींचे संकलन करून नदीपात्रातील सखोल भागात विसर्जित करण्यात आले. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साखरवाडी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता ही सेवा अभियान राबवले. याचाच एक भाग म्हणून गोदावरी नदीकाठी साचलेल्या सर्व मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
डायरेक्टर श्री सुहास गोडगे यांनी सांगितले की सर्व नागरिकांनी शाडू मातीच्या गणपतीला विशेष पसंती दिली पाहिजे जेणेकरून गणपती विसर्जन झाल्यानंतर गणपती मूर्ती पाण्यात विरघळली जाईल जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. यावेळी जनरल मॅनेजर श्री. प्रवीण विभूते, श्री. धनंजय मोरे, श्री. रायभान गायकवाड, श्री. संजयकुमार शिंदे, श्री. सौदागर कुलाल, श्री. बळवंत पाटील, श्री. दिपक पाठक, श्री. गोपिराज जंगम, श्री. नितीन पाटील, श्री. नितीन कुलकर्णी, श्री. सोमनाथ कुलथे, श्री. योगेश बागल, श्री. संजय कऱ्हाळे, श्री. सुरज वाणी, श्री. साईनाथ चव्हाण, श्री. गणेश पाटील, श्री. रवींद्र भोकरे, श्री. भारत उंडे, श्री. अंकुश गुडघे, श्री. अरुण बोरनारे, श्री. प्रशांत शिरसाठ, श्री. संदीप नरोडे, श्री. श्रीधर धमाळ, श्री. संदीप थोरात, श्री. मनीष ओसवाल, श्री. श्याम देवकर, श्री. देवेंद्र वाघ, श्री. संदेश गोडगे, श्री. राहुल काकडे तसेच अन्य अधिकारी व कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. गोदावरी बायोरिफायनरीज लि. मधील अधिकाऱ्यांनी केलेल्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *