
कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २६/०६/ २०२३ रोजी सांयकाळी ०७.०० ते ०७.३० वा चे सुमारास संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंच येथे फिर्यादी नामे अमोल धोंडीराम मोहोते, वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, मुळ रा. मांदुर्ण ता. चाळीगाव जि.जळगाव हरा गुरुराज HP गॅस एजेन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव जि. अहमदनगर व त्यांचे सोबत कुणाल इंगळे यांचे पेट्रोल डिझेल भरण्याचे काम चालु होते. त्यावेळी काळया रंगाचे पल्सर मोटार सायकलवर तीन अज्ञात इसमांनी येवुन त्यांचे एक इसमांनी विनाकारण यातील फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते, वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, मुळ रा. मांदुर्णे ता. चाळगाव जि.जळगाव ह.रा.गुरुराज HP गॅस एजेन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांना धक्काबुक्की करून त्याचे कानाखाली मारली त्यावेळी ते पाहुन पेट्रोलपंपाचे मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव वय ४० वर्षे रा. दहेगाव बोलका ता. कोपरगाव जि. अहमदनगर हे कॅबीनमधुन बाहेर आले व फिर्यादीस मारहान करणारे अनोळखी इसमास तु माझ्या मानसाला का मारले बाबत विचारपुस केली असता, त्याला त्याचा राग आल्याने व त्याचे सोबत असलेले त्याचे इतर साथीदारांनी त्याला मारून टाक सोडु नको असे म्हणाले तेव्हा त्या अनोळखी इसमाने मँनेजर भोजराज बाबुराव घनघाव यांची गचांडी धरून त्यास धारदार चाकुने पोटात व खांदयावर वार करून त्यांचेकडील पल्सर मोटार सायकलवर बसुन पळून कगेले होते. त्यामध्ये जखमी झालेल्या मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव वय ४० वर्ष रा. दहेगाव बोलका ता. कोपरगाव यांना उपचारकामी साईबाबा सुपर हॉस्पीटल शिर्डी येथे दाखल असतांना तो मयत झाला आहे. सदरची घटना घडली बाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ घटना ठिकाणी जावुन पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सदरचा गुन्हा तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येवुन केला असल्याचे निष्पन्न होत असल्याने नमुद अनोळखी तीन आरोपीचे शोधकामी दोन पथके तात्काळ तयार करुन शिर्डी व नाशिक येथे रवाना केले.

झालेल्या घटनेबाबत अमोल धोंडीराम मोहीते, वय २५ वर्षे, धंदा खाजगी नोकरी, मुळ रा. मांदुर्णे ता. चाळीगाव जि.जळगाव ह.रा. गुरुराज HP गॅस एजेन्सी, संवत्सर शिवार ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन तीन अनोळखी इसमाविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरजि नंबर ३१०/२०२३ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे दिनांक ३०.०६.२०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचे शोधकामी तयार केलेले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपीच फेसबुक इंस्टाग्रामवरुन फोटो प्राप्त करुन त्यांचे वास्तव्या बाबत गोपनीय माहीती प्राप्त करून आरोपींचा शोध घेवून शिर्डी येथुन एक व नाशिक येथून एक असे दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे. असुन त्यांचा एक साथीदार फरार झाला असल्याचे त्यांने सांगितले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा पेट्रोलपंपावर धक्काबुक्की करुन झालेल्या वादातुन केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद दोन्ही आरोपीना अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करीत आहेत. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहोत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, श्रीरामपुर विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. संदीप मिटके, सो. शिर्डी विभाग शिर्डी यांच मार्गदर्शनाखाली. पो. नि. रामराव ढिकले, पोउपनि रोहीदास ठोंबरे, पोउपनि भरत दाते, पोकों/ 652 जालींधर तमनर पोकॉ/2622 संभाजी शिंदे, पोकों/ 1941 गणेश मैड, पोकों/ 2611 राम खारतोडे, पोकों/2563 गणेश काकडे, पोकों/मैंद, पोकों/चव्हाण, पोकों/ 2461 बाळु धोंगडे, पोकों/ 1431 ज्ञानेश्वर भांगरे, पोकों/खंडेराव रहाने होमगार्ड गणेश लकारे, होमगार्ड अजय जाधव, होमगार्ड अविनाश गायकवाड, होमगार्ड सुभान शेख यांनी केलेली आहे.
