
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगावात प्रथमच सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती या सुप्रसिद्ध शो मध्ये थेट प्रेक्षक म्हणून सहभाग घेता येणार यासाठी सोनी मराठी चॅनलच्या या चमुने कोपरगावातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम पहाण्यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडीयमसह अनेक विदयालयातील शिक्षक,विद्यार्थ्यां, नागरिक उपस्थित होते. सोनी मराठी कडून आयोजित या कार्यक्रमात कोपरगावतील दहा व्यक्तींचा मुंबई येथे होणाऱ्या “कोण होणार करोडपती” या टाॕक शो साठी प्रेक्षक म्हणून सुप्रसिद्ध मराठी हिरो सचिन खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम बघण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या दहा विजेत्यांमध्ये ठोळे उद्योग समुहाचे कैलासचंद ठोळे,सपना जाधव,निवृत्त माजी मुख्याध्यापक श्री. चंदुलाल बजाज, डॉ.सोनिया रणदिवे,कला शिक्षक अतुल कोताडे, साहीत्य परीषदेचे श्री.सुधीर (राजेंद्र) कोयटे,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडीयमच्या प्रियंका सोनवणे,दिलीप तुपसैंदर, नितीन जाधव, कोपरगावची आकाशवाणी श्री. विजय कासलीवाल यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत टाॕक शो मध्ये जाण्यासाठी “गोल्डन पास” प्राप्त केला. विजेत्यांना सोनी टी.व्ही तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन कोपरगावात प्रथमच केल्याबद्दल सोनी मराठीच्या टीमने स्वच्छतादूत सुशांत घोडके, निवेदक श्रीकांत बागुल तसेच विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी मराठीचे आर.जे. श्रीकांत यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.या वेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअमरन चंद्रकांत ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,श्री.संदीप अजमेरे,जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.विशाल झावरे,माजी नगरसेवक विवेक सोनवणे, उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. गायकवाड,जेष्ठ शिक्षिका रायते यु.एस,सौ. मोनाली निंबाळकर,सौ. पल्लवी तुपसौंदर उमाताई रायते मॅडम,संत ज्ञानेश्वरचे मुख्याध्यापक सचिन मोरे, सहशिक्षिका वसुधा झावरे,प्रियांका शेलार,सोनाली हुळेकर,स्वाती गहिरे,सहशिक्षक अनुप गिरमे यांचे सह श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय आणि संत ज्ञानेश्वर स्कूलचे शिक्षक, नागरिक उपस्थित होते.
