यंदा आषाढी आणि श्रावणातले उपवास महागणार..!!

Uncategorized

राजगिरा, गूळ, साबुदाणा, पॅकिंग साठी लागणारे प्लॅस्टिक ,मजुरी यात 20 टक्क्यांची वाढ…
कोपरगाव प्रतिनिधी:-
यंदा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच शेतकरी बाकीच्या पिकांना मिळणारा भाव या कारणांनी शेतकरी राजगिराचे पीक हे फार कमी प्रमाणात तयार करते महाराष्ट्रात राजगिरा पिकण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे बाहेरील राज्यातून राजगिरा हा महाराष्ट्रात आणला जातो त्यासाठी आयात निर्यात खर्च बाहेरील राज्यात देण्यास लागणारा कर जकात महा आणि महाराष्ट्रातील जकात आणि कर अशा विविध कारणांमुळे कच्च्या राजगिराचे भाव 20 टक्क्यांनी महागले असून यावर्षी राजगिरा लाडू राजगिरा चिक्की राजगिरा पीठ 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे. यावेळेस कालांश उद्योग राजगिरा लाडू आणि चिक्की चे उत्पादक रोहित काळे यांनी सांगितले की जर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राजगिराचे पीक शेतकऱ्यांनी घेतले तर या चा खर्च हा आटोक्यात येईल महाराष्ट्रासाठी उपवास हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो त्यात आषाढी एकादशी श्रावण नवरात्री आणि इतर छोटे-मोठे उपवास महाराष्ट्रात आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात त्यामुळे महाराष्ट्रासाठी उपवासाला एक महत्त्व प्राप्त झाले आहे त्याचबरोबर येणे साबुदाणा ही 20 टक्क्यांनी वाढला असून .यासाठी पॅकिंग करण्यासाठी लागणारे प्लास्टिक यात सुद्धा 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यात कामगार आणि मजुरी सुद्धा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे या सर्व कारणांमुळे उपासातील अत्यंत महत्त्वाचे पदार्थ महागाईच्या कात्रीत सापडले आले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध छोट्या-मोठ्या ग्रामीण भागात राजगिरा लाडू बनवणारे लघुउद्योग आहेत होतकरू महिला आहेत एक सोबत भांडवल गुंतवणूक न करणारे छोटे मोठे लघु व्यवसायांना या स्वरूपातील कच्चामाल अतिशय महाग किमती घ्यावा लागतो आणि स्पर्धेच्या युगात महा किमतीत विकू न शकणाऱ्या या उद्योजकांना फार मोठा परिणामा सामोरे जावे लागणार आहे मोठ्या उत्पादकांना सुद्धा बाजार भाव या दरम्यान संतुलित ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *