वारीत महाश्रमदानातून परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ४५ वा” उत्साहात संपन्न..!

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी, जय बाबाजी भक्त परिवार, वारी व राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवीवर्षानिमित्त रविवार (दि. २२ जानेवारी २०२३) नववर्षानिमित्त सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तब्बल ४ तास महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ४५ वा” यशस्वीपणे राबविण्यात आला.
या अभियानात वारी येथील बाजारतळ परिसरातील पंचशील ध्वज परिसर, अमरधाम व गोदावरी नदी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. तसेच संकलित केलेला कचरा, प्लास्टिक पिशव्या, काटेरी झुडपा तोडून पेटवून देण्यात आल्या. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते मधुकरराव टेके, जय बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, सेवानिवृत्त अधिकारी रावसाहेब जगताप साहेब,पंडित लकारे, सेतू कार्यालयाचे संचालक रवींद्र टेके, ‘लोकमत’चे उपसंपादक रोहित टेके, गोदावरी बायोरीफायनरीजचे अधिकारी निलेश संत साहेब, विलास गाडेकर, वारी ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ, विलास जगधने, मनोज जगधने, यांनी स्वच्छतेच्या या अभियानात आपले श्रमरुपी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *