दुचाकी चोरणार्या चोरट्यांना अखेर कोपरगाव पोलिसांनी केली अटक लाखोंचा मुद्देमाल जप्त…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुका परिसरातील ३ अट्टल दुचाकी चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर चोरांकडून ८ लाख ६५ हजार किमतीच्या १३ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कोपरगाव शहर पोलिसांनी केली . कोपरगाव शहर व तालुका व नजीकच्या तालुक्यातही या चोरांनी धुमाकूल घातला होता. अखेर पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबतीत अनके तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे गेले अनेक दिवसांपासून पोलीस या चोरट्यांच्या शोधात होते. त्यांच्या चोरीमुळे दुचाकींना घेऊन चांगलीच दहशत परिसरात पसरली होती. अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसत होते. परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलीस या चोरांच्या शोधात कसून तपास करत होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले कोपरगाव औद्योगिक वसाहत व शिंगणापूर या ठिकाणी चोरीची बुलेट विकण्यासाठी येत असल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना कळाले त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पुंड पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल कुऱ्हाडे या आपल्या कर्मचाऱ्यामार्फत सापळा लावला व या ३ चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले.
सदर चोरांचा शोध घेताना आज कोपरगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. आणि ३ अट्टल दुचाकी चोरांना अटक केली. या चोरांची नावे किशोर साहेबराव कापसे (२१) सचिन अंबादास कापसे (२०) दोन्ही राहणार तागडी, तालुका चांदवड जिल्हा नाशिक व तिसरा साथीदार चेतन रमण कापसे(१९) सदर चोरांकडून आठ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. शिवाय पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या अटकेनंतर शहर व तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *