
कोपरगाव प्रतिनिधी:-
कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतिने संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे समाजाच्या विकासाठी विविध उपक्रम राबवीत असतात.असाच एक उपक्रम गणेशोत्सवा निमित्ताने समाजातील विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुणवंत . विद्यार्थ्यांचा सन्मान करत त्यांचा सत्कार केला आहे.

डाँ .सी.एम.कन्या विद्यालयात एन.एम.एम.एस परिक्षेत प्रथम क्रमंकाने शरवरी राहुल कहार उत्त्तीर्ण ,डी फार्मसी विशेष प्रावीण्य वैष्णवी राजेंद्र गंगुले, बी फार्मसी A+ ग्रेड. उमा देविदास लहिरे, कल्याणी राजेंद्र गंगुले १२ वी काँमर्स ८१ टक्के असे गुणवंत विद्यार्थींचा सन्मानपत्र ट्राफी देवुन सत्कार करण्यात आला आहे. तर रांगोळी स्पर्धेत प्राजक्ता नंदलाल रासणे प्रथम, तेजस्वीनी अशोक कुंढारे व्दितीय, सुनिता शांतीलाल कट्टे तृतीय, महालक्ष्मी सजावट स्पर्धेत, देवयानी प्रशांत लकारे प्रथम, शुभाणी गव्हाणे व्दितीय, आणि गणपती सजावट स्पर्धेत जयश्री डिंबर प्रथम, प्राजक्ता रासणे व्दितिय क्रमाकाने उतिर्ण झाल्या असुन या सर्वांना १० ग्रँमचे चांदीचे नाणे ट्राफी सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला आहे.
