
कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर ):-
भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा जलनायक पुरस्कार पत्रकार शिवाजी घाडगे यांना जाहीर झाला आहे
स्मृती चिन्ह , समानप्रमाणपत्र,रोख रक्कम ,जल नायक नवी दिल्लीत गौरविण्यात येणार आहे
जल व्यवस्थापन वर उत्कृष्ट कार्य करणारे सहा जलनायक निवडण्यात आले असुन महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार शिवाजी घाडगे यांचा त्यात समावेश आहे
जलनायकांच्या यशोगाथा २०२२ साठी पत्रकार शिवाजी घाडगे यांची निवड झाली आहे ते महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहेत जल संवर्धन व शाश्वत विकासाला जन आदोलन स्वरुप प्राप्त व्हावे या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताच्या पाणी व्यवस्थापन मोहीमेव्दारे केंद्रीय जल मंत्रालयाने निवडलेल्या देशातील सहा जलनायका मध्ये महाराष्ट्रातील पत्रकार शिवाजी घाडगे हे माध्यम क्षेत्रात पहिले जलनायक (वाटर हिरो) ठरले आहेत गेली तीन दशके पत्रकारीता क्षेत्रात जल व्यवस्थापन व जलसाक्षरता विषयी लेखन व प्रबोधन पत्रकार शिवाजी घाडगे यांनी केले आहे शालेय विद्यार्थी मध्ये जल प्रबोधन तसेच
जल जनजागृती व नदी स्वच्छतेबाबत त्यांनी प्रबोधन केले आहे त्यांना लवकरच नवी दिल्ली येथे मान्यवराच्या हस्ते जलनायक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
