
एकापाठोपाठ संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विध्यार्थी होताय नोकरदार...
कोपरगांव प्रतिनिधी:-
कोणत्यांही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पालक जेव्हा आपल्या पाल्याला शिक्षणासाठी दाखल करतात, तेव्हा माझ्या पाल्याला चांगली नोकरी मिळाली पाहीजे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन पाल्यांच्या पंखात बळ भरीत असतात. अशा स्वप्नांची परीपुर्ती म्हणुन अलिकडेच वेगवेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीच्या थर्मोफिशर सायंटीफिक, माईंडट्री, असेंचर व नॅश इंडस्ट्रीज या कंपन्यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकुण १४ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केल्याचे जाहिर केले असुन मागील महिण्यात घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे निकाल जाहिर होत असुन एका पाठोपाठ विध्यार्थ्यांची आकर्शक पगारावर निवड होत असल्याने विध्यार्थी व पालकांमध्ये प्रत्येक वेळी आनंद व्यक्त होत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी म्हटले आहे की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध अभियांत्रिकी शाखांच्या पहिल्या वर्षापासून ऊद्योग जगताला अभिप्रेत असणारे आधुनिक तंत्रज्ञान शिकविण्या बाबत अधिक भर दिला जातो. त्यानुसार शाखानिहाय विध्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत आहे. अलिकडेच थर्मोफिशर सायंटिफिक या बायोमेडीकल व साॅफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीने वैभव नामदेव दारूंटे, सुबोध संजय जाधव, पुणम दिलीप सांगळे व ऋतुजा शिवाजी औटी या चार विध्यार्थ्यांची निवड केली आहे. जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व सल्ला सेवा पुरविणाऱ्या माईंडट्री या कंपनीने अस्मा बनेखा फकिर, शुभम माणिकराव चव्हाण व सचिन बाल्मिक धट या तीन विध्यार्थ्यांची निवड केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या असेंचर या कंपनीने रोशन सोपान जाधव, पुणम दिलीप सांगळे व दुष्यंत प्रमोद जाधव या तीघांची निवड केली आहे. यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध मशिनरींचे उत्पादन करणाऱ्या नॅश इंडस्ट्रीज या कंपनीने निकीता विलास नागरे, रेणुका एकनाथ सोनवणे, आकाश आण्णासाहेब मतसागर व राहुल राजु मोरे या चौघांची निवड केली आहे. निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांच्या पालकांनी खुप आनंद व्यक्त केला असुन संजीवनीमुळे आमच्या स्वप्नांची स्वप्नपुर्ती झाल्याचे नमुद केले.
विविध कंपन्यांमधिल विध्यार्थ्यांच्या निवडीमुळे माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरत असल्याची प्रतिक्रिया संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी दिली आहे. विध्यार्थ्यांच्या या निवडीबध्दल श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले असुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम व विभाग प्रमुखांचेही अभिनंदन केले.
विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘मी नेवासा तालुक्यातील वाटापुर या साध्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी आहे. आमच्या कुटूंबातील नोकरीसाठी बाहेर पडणारी मी पहिली मुलगी आहे. अगदी पहिल्या वर्षापासून मुलाखतीचे तंत्र, देहबोली, व्यक्तीमत्व विकास या सर्व बाबींची रूजवण आमच्याकडून करून घेण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आमच्याकडून मुलाखतींचा सराव करून घेतला. त्यामुूळेच थर्मोफिशर कंपनीच्या सर्व कसोट्या पुर्ण करू शकले व माझी या कंपनीने निवड करून सुरूवातीलाच वार्षिक पॅकेज रू ८. ५ लाख दिले. माझ्या जीवनातील हा सर्वोच्च आनंद असुन माझ्या शेतकरी आई वडीलांचे स्वप्न मी पुर्ण करू शकले, हे केवळ संजीवनमुळेच.’-ऋतुजा औटी.
‘मी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रहिवासी असुन माझ्या अनेक मित्रांना पुण्याचे आकर्षण होते, परंतु माझे वडील सरकारी बॅन्केत नोकरीला असल्याने त्यांना संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन शिक्षण घेतल्यास नोकरी हमखास मिळते हे माहित होते व त्यांनी मला संजीवनी मध्येच दाखल केले. मागील चार वर्षात आमच्याकडून खुप टेक्नीकल बाबींचा सराव करून घेण्यात आला. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षात जो प्रोजेक्ट करायचा असतो तो आपल्याला नोकरी मिळविण्यासाठी उपयोगी पडला पाहीजे, अशा पध्दतीने येथे प्रोजेक्ट करण्यास प्रोत्साहीत केल्या जाते. माझा प्रोजेक्ट आयओटी बेस्ड असल्याने माझी माईंडट्री मध्ये निवड होण्यास खुप मदत झाली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने आमच्या घेतलेले श्रम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’-शुभम चव्हाण.
