संजीवनी मार्फत विध्यार्थी व पालकांची स्वप्न पुर्ती
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने डीएक्ससी टेक्नालाॅजी या आय टी क्षेत्रात ७० पेक्षा अधिक देशात सेवा पुरविणाऱ्या कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विध्यार्थ्यांच्या परीसर मुलाखती घेतल्या होत्या. कंपनीने या मुलाखतींचा निकाल नुकताच जाहिर केला असुन यात संजीवनीच्या सहा विध्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड झाली आहे. अशा पध्दतीने शेकडो विद्यार्थ्यांनी पाहीलेले नोकरदार होण्याचे स्वप्न व पालकांनी त्यांच्या पाल्यांबाबत डोळ्यात साठवुन ठेवलेले स्वप्न संजीवनीच्या प्रयत्नाने पुर्ण होत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की या महाकाय जगतात पालकांसाठी त्यांची संतती हीच त्यांच्या जीवनातील अनमोल संपत्ती असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्याने सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवुन स्थिर स्थावर व्हावे, पाल्यांनी त्यांच्या व त्यांच्यावर अवलंबुन असणाऱ्या व्यक्तिंच्या महत्वाकांक्षा पुर्ण कराव्यात, अशी माफक इच्छा उराशी बाळगुण पालक आपल्या पाल्यांच्या पखांमध्ये बळ भरीत असतात. आपली आर्थिक हतबलता पाल्यांच्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आडवी येणार नाही, याचीही पालक काळजी घेत असतात.
पालकांनी त्यांच्या पाल्यांना संजीवनीमध्ये दाखल करून टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी विभाग निहाय औद्योगीक जगताला अभिप्रेत असलेले आधुनिक तंत्र शिक्षण संजीवनीमध्ये दिले जाते. याचाच परीपाक म्हणुन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या दरवर्षी विध्यार्थ्यांच्या परीसर मुलाखती घेवुन शेकडो नवोदित अभियंत्यांना नोकरीसाठी पहिल्या पसंतीने निवड करतात. अलिकडेच डीएक्ससी टेक्नालाॅजीने निवड केलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये मानसी प्रविण दरांगे, कोमल बाळासाहेब शिरसाठ, दिक्षा अनिल सरोदे, कल्याणी जयराम क्षिरसागर, वैष्णवी दिपक खिंडारे व अभिषेक अजित धस यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक कंपनीमध्ये निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये मुलींची संख्या उल्लेखनिय असते. ग्रामिण भागातील मुला-मुलींना रोजगार मिळाला पाहीजे या हेतुने सुमारे ४० वर्षांपूर्वी माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी सर्व प्रथम पाॅलीटेक्निकची स्थापना केली. त्यांच्या या संस्थेेमधुन हजारो नवोदित अभियंते तयार होवुन ग्रामिण कुटूंबे प्रगतीच्या प्रवाहात येवुन खऱ्या अर्थाने अशा कुटूंबांचे अर्थकारण गतिमान झाले आहे. आज शेकडो विध्यार्थी स्वावलंबी होत आहे, ही खऱ्या अर्थाने कै. कोल्हे यांना आदरांजली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद व विभाग प्रमुख प्रा. गणेश जोर्वेकर उपस्थित होते.

फोटो ओळीः- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे समवेत डीएक्ससी टेक्नालाॅजी या कंपनी मध्ये नोकरीसाठी निवड झालेले नवोदित अभियंते. यावेळी प्रा. मिरीकर, प्रा. सय्यद व प्रा. जोर्वेकर उपस्थित होते.
