बाळासाहेब नरोडे यांचे अपघाती निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
तालुक्यातील येसगांव येथील प्रगतशील शेतकरी व दुग्धव्यवसायीक बाळासाहेब ऊर्फ बाळू सुकदेव नरोडे (५२) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे वयोवृद्ध आई-वडील, तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक विवाहीत मुलगी, जावई असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे कर्मचारी रमेश तसेच सुभाष व विलास नरोडे यांचे ते बंधू होते.
कै. बाळासाहेब नरोडे यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्व परिचित होते. त्यांच्यावर सुरुवातीला फडके हॉस्पीटल कोपरगांव तर नाशिक येथील अशोका रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुक्रवारी उपचार सुरू असतानाच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. कै. बाबासाहेब ऊर्फ बाळू नरोडे यांच्या पा पार्थिवावर येसगाव येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ नेते दत्तात्रेय कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदींनी श्रद्धांजली वाहिली, याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *