माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे:- शरद पवार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे.
राज्यातल्या कृषी उत्पादनातल्या प्रयोगशीलतेला व्यापक चालना दिली ती शंकरराव अप्पांनी. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळालं होतं.
अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला.
पाटपाण्याचा प्रश्न सोडवला. खंडकरी शेतकर्‍यांची चळवळ चालवली. सहकारी संस्थांसोबत शिक्षणसंस्थांचे मोठे जाळे उभारले.
साखर या विषयासाठी जगभ्रमंती करून शंकररावांनी प्रचंड व्यासंग केला. ग्रामीण विकासासाठी आंतरिक तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती हे त्यांचे गुणविशेष सामाजिक क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अंगिकारावे असे होते.
त्यांचा आप्तपरिवार व सर्वदूर पसरलेल्या सहकार क्षेत्रातल्या अनुयायांप्रति माझ्या शोकसंवेदना! स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना श्रद्धासुमन!
शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *