आमदार आशुतोष काळे यांनी वारीच्या पुलासाठी २० कोटी रुपये निधी देवून वारीकरांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरविले:- मधुकर टेके…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- मागील अनेक वर्षापासूनचा गोदावरी नदीवरील वारी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून वारी पुलासाठी २० कोटी निधी देवून महत्वाचा प्रश्न सोडविल्याबद्दल व वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविल्याबद्दल वारी ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्वाच्या असलेला वारी येथील गोदावरी नदीवरील पुलाचा प्रश्न मागील पाच ते सहा दशकापासून प्रलंबित होता. हा पूल बांधण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील प्रयत्न केले होते. मात्र २०१४ ला झालेला सत्ताबदल त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ. आशुतोष काळे त्याबाबत पाठपुरावा करीत होते. मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याची दखल घेवून हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात वारी येथील गोदावरी नदीवरील पुलासाठी तब्बल २० कोटी रुपये निधी मंजूर केला. त्यावेळी वारी ग्रामस्थांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला होता.
अनेक वर्षापासून अनुत्तरीत असलेला वारी पुलाचा प्रश्न सोडवू असा शब्द आ.आशुतोष काळे यांनी वारी ग्रामस्थांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करून त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली त्याचबरोबर वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न देखील सोडविला. त्याबद्दल वारी ग्रामस्थांनी आ.आशुतोष काळे यांचा कोपरगाव येथे नुकताच सत्कार करून वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेले अत्यंत महत्वाचे प्रश्न सोडविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, नानासाहेब टेके, सुखदेव मुसळे, संजय जाधव, दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब मलिक, रमेश मलिक, भगवान पठाडे, रमेश कोकाटे, भास्करराव आदमाणे, अशोक मलिक, सुंदरराव जाधव, मिनीनाथ नरोडे, बबलू गडाख आदी उपस्थित होते.
चौकट :- महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. मागील दोन वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील अत्यंत महत्वाचे प्रश्न सोडविता आले याचे मोठे समाधान आहे. मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न यापुढील काळात मार्गी लावणार आहे. नागरिकांच्या विकासाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील – आ. आशुतोष काळे
चौकट : वारी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते खासदारकीच्या निवडणुकी पर्यंत अनेक निवडणुकांच्या प्रचारा दरम्यान अनेक नेत्यांकडून वारी पुलाचा प्रश्न मार्गी लावु अशी आश्वासने दिली गेली. मात्र वारी पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे वगळता कुणाकडूनही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे वारीकरांसाठी वारी पुल हे स्वप्नच राहते की काय असे वारीसह व पंचक्रोशीतील नागरिकांना वाटत होते. मात्र सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी वारीच्या पुलासाठी २० कोटी रुपये निधी देवून वारीकरांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरविले आहे.- मधुकर टेके प.स.सदस्य.

फोटो ओळ:-
वारी पुलासाठी २० कोटी निधी दिल्याबद्दल व वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना वारी ग्रामस्थ.
