नगर पालिका शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती करावी:- सुजल चंदनशिव…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
गेल्या आठ दहा महिन्यापासून शाळा बंद असून शासनाने लवकरच शाळा सुरू करणार असल्याचे जाहीर केले त्या पूर्वी नगरपालिकेने शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे युवा शहर अध्यक्ष सुजल चंदनशिव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
लोक स्वराज्य आंदोलनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात चंदनशिव पुढे म्हणाले की, गेल्या आठ दहा महिन्या पासून कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा महाविद्यालये बंद आहे मात्र शासनाने नुकतेच शाळा सुरू करणार असल्याचे जाहीर केले मात्र या कालावधीत नगर पालिकेच्या सर्वच शाळेच्या शौचालयाची दुरवस्था झाली असून शौचालयाचे दरवाजे, भांडे,तुटलेले आहेत अनेक शौचालयात पाण्याचे नळ तुटलेले आहेत तर काही ठिकाणी दरवाजाचे कडी कोंडे तुटलेले आहेत त्यात जाळे व घाण झाली असून याकडे कोणाचे लक्ष दिसत नाही.


नगर पालिकेच्या शाळेत अनेक गोरगरीबाची मुले शिक्षण घेत असून एका बाजूला नगर पालिका गावात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेच्या स्पर्धेत उतरत आहे देशाचे पंतप्रधान देशवासीयांना स्वच्छतेचा संदेश देत असतात तर दुसरीकडे नगर पालिकेच्या शिक्षण विभागातून सुरू असलेल्या शाळा मध्ये स्वच्छतेचा बोजवारा झाल्याचे दिसून येत आहे शाळा सुरू होण्यापूर्वी या शौचालयाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या पत्रकात केली आहे
या पत्रकावर लोक स्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष किरण अढांगळे, किरण सोळसे, राजू रोकडे सागर म्हस्के,लखन साठे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *