द्या एक मिनिट कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत अनेक वेळा केंद्र व राज्य शासन दरबारी पत्रव्यवहार करणारे समाजसेवक श्री.राजेशजी मंटाला यांनी कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत मा.प्रधानमंत्री साहेब,मा.मुख्यमंत्री साहेब,मा.उपमुख्यमंत्री साहेब यांना दि.24,25,26 जानेवारी 2021रोजी ई-मेल पाठविण्याचे जन आंदोलन सुरू केले आहे.याबाबत माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील,माजी नगरसेवक श्री.दिनारजी कुदळे, प्रसिद्ध अकौंटन्ट श्री.नितीनजी डोंगरे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे.तसेच या तीन दिवसांत आम्ही कमीत कमी 10व जास्तीत जास्त 100 वर ई-मेल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.कोपरगांव शहरातील नागरिकांना आम्ही आवाहन करतो की, पाणीप्रश्नी या विनामुल्य आंदोलनात केवळ एक ईमेल करायचा आहे.कदाचित आपला एक ई-मेल ,असें सर्वांनी जर यात सहभाग घेतला तर हजाराच्या प्रमाणात जर इमेल गेले तर निश्चित चं कोपरगांवचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
या सहभागी व्हा…
द्या एक मिनिट कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *