कोपरगावच्या नेत्यांना नागरी समस्या सोडवण्यासाठी सुबुद्धी मिळो:- अँड नितीन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराच्या विकास कामाच्या श्रेयवादा वरून कोपरगाव शहरात सध्या कलगी तुरा रंगात आला असून श्रेय वादाच्या लढाईची आता किळस येत असून नेत्यांना विकास कामाची सुबुद्धी मिळो मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
कोपरगाव शहरातील विस्तापित टपरी धारक रस्ते,पाणी,स्वच्छता व नागरी समस्या या कोपरगाव कर जनतेच्या पाचवीला पूजलेल्या असून जनतेने कोपरगाचा विकास होईल या भाबड्या आशेने अनेक वेळा खांदे पालट करून पहिली मात्र अनेक वर्षांपासून रस्ते,पाणी स्वच्छता अशा ज्या समस्या होत्या त्या तशाच आहेत मात्र निवडणूक जवळ आली की कोपरगावच्या नेत्यांना विकास कामाचा पान्हा फुटत असतो
मात्र जनतेच्या खऱ्या समस्या सोडवण्या ऐवजी श्रेयवादाचा कलगी तुरा सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून राजकीय नेते मंडळी जनतेचे मनोरंजन करत असले तरी विकास कामाकडे दुर्लक्ष होत आहे हे मात्र नक्की ..
दोन महिन्यापूर्वी विस्तापित टपरी धारकांच्या प्रश्नावर अशाच प्रकारे राजकीय मंडळींनी पद्धतशीर वातावरण निर्मिती केली होती मात्र सत्ताधारी व विरोधक यांनी जाणीव पूर्वक विस्थापितांच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षदा दिल्या असून पाच नंबर पाण्याचे तळे व त्या बाबत देखील असेच वातावरण निर्माण केले होते गेल्या आठ दिवसापासून विकास कामाच्या निविदा व त्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप पाहता जनतेला हा विषय चघळत ठेवयाला लावून श्रेयवादापेक्षाही कमिशन वाटून घेण्यावरून वरून चाललेला कलगीतुरा आहे कोपरगाव शहराच्या समस्या पेक्षा ही राजकीय नेत्यांना आगामी निवडणुकी साठी पैशाची जमवा जमव करण्याच्या दृष्टीने आखलेली रणनीती असून “म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावत आहे” हे जनतेच्या लक्षात आले असून विकास कामाचा डांगोरा पिटण्या पेक्षा जनतेला प्रत्यक्ष नागरी समस्या सुटाव्यात ही अपेक्षा असून या आरोपातून राजकीय नेत्यांचा ढोंगीपणा उघड होत आहे त्यामुळे विरोधकांनी अव्वा च्या सव्वा रकमेचे प्रस्ताव तयार केल्याचा आरोप खरा खोटा ठरवण्या साठी सदर कामाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञांच्या सल्ल्याने अंदाजपत्रक निश्चित करावे व त्याच्या मंजुरी साठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक बोलण्यात येऊन सदर विषय त्या बैठकीत मांडावे असेही या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *