महादेव कोळी चौथरा स्मारकाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा यासाठी आमदार डॉ.किरण लहामटे यांना निवेदन देण्यात आले:- आदिवासी कोळी महादेव युवक संघटना जिल्हाध्यक्ष अमित आगलावे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
“महादेव कोळी चौथरा ” स्मारकाचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करावा यासाठीआमदार डॉक्टर किरण लहामटे यांना निवेदन दिले :- आदिवासी कोळी महादेव युवक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री अमित आगलावे व शिष्टमंडळाने माननीय आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना राजूर येथे भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की महादेव कोळ्यांचा शिवनेरीवर संहार-
पुणे परिसरातील शिवरायांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्यांचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मुघलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली.


शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्या मुघल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १६०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला महादेव कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाईल.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ६९९-७११ अश्या पराक्रमाची गाथा सांगणा-या महादेव कोळी चौथरा स्मारकास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देवून त्या ठिकाणाचा विकास करण्यात यावा. त्या मध्ये प्रामुख्याने :
1) आदिवासी शुरवीरांची शिल्पे उभारण्यात यावी
2) महाराष्ट्रातील सर्व आदिवासी क्रांतीकारक व स्वातंत्र्य लढयातील योध्यांची दुक श्राव्य स्वरूपात अभ्यासिका निर्माण करण्यात यावी.
3) एका 100 आसनी अॅम्पीथेटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून आदिवासी

संस्कृती,कला,संगित इ.चा माहीतीपट 3D स्वरूपात दाखविण्यात यावी.
4) सुंदर नक्षत्र व वन औषधी उदयान निर्माण करून प्रत्येक आश्रमशाळेची सहल या ठिकाणी नेण्यात यावी त्याच बरोबर अन्य विदयार्थ्यांनाही आदिवासी समाजाच्या पराक्रमांची ओळख करून देण्यात यावी.
5) दरवर्षी आदय क्रांतीकारक राघोजी भांगरे जयंती निमित्ताने या ठिकाणी आदिवासी कला महोत्सव महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागामार्फत भरविण्यात यावा.
तरी कृपया महादेव कोळी चौथरा स्मारकास तिर्थक्षेत्राचा दर्जा देउन विकास करणेस नम्र विनंती करण्यात आली. यावेळी श्री मनोहर शिंदे अशोक उंडे सुरेश पांडे सुनील पोरे चंद्रकांत शेजुळ नंदकुमार लांडगे अनिल पारधी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते माननीय आमदारांनी याबाबत महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *