भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या देशातील मोठया कंपनीच्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातून कोपरगांव येथील अॅड.रवींद्र बोरावके यांची नियुक्ती..!!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- संपुर्ण भारतात व परदेशातही आपल्या सेवा असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या देशातील मोठया कंपनीच्या संचालक मंडळावर महाराष्ट्रातून कोपरगांव येथील अॅड.रवींद्र बोरावके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान बोरावके यांनी देशातील सर्वात मोठ्या असलेल्या दूरसंचार कंपनीस पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. देशासोबतच विदेशातही आपला व्यवसाय असणाऱ्या केंद्र सरकारच्या मालकी असलेल्या बी एस एन एलच्या संचालक पदी निवड झाल्याने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. बोरावके यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.याबद्दल माहिती सांगताना .बोरावके म्हणाले, संपुर्ण भारतात व भारता बाहेरही व्यवसाय असलेल्या या कंपनीचा खूप मोठा कारभार आहे. अब्जावधी रूपये किमतीच्या मालमत्ता आहेत. सर्वत्र टॉवर आहेत. इतर कंपन्यांनाही ते भाडेतत्वावर वापरावयास देण्यात येतात. भारतात जवळपास ७० टक्के लॅन्डलाईन टेलीफोन देणारी ,तसेच सर्वात जास्त व चांगली ब्रॉडबॅन्ड सेवा, वाय फाय सेवा देणारी बी.एस. एन.एल ही अग्रगण्य कंपनी आहे. भारतातील प्रामीण भागात खेडोपाडीही मोबाईल सेवा फक्त बी.एस.एन. एल चीच चांगल्या प्रकारची आहे. टेलीफोन ,फायबर केबल, मोबाईल व इतर उपकरणे निर्मित करण्यासाठी पाच फॅक्टरीज आहेत. ट्रेनिंग देणाया तीन इन्सीटयूटस आहेत.त्याचप्रमाणे देखभाल विभाग, संशोधन विभाग, ग्राहक विभाग मार्केटींग विभाग असे वेगवेगळया २४ विभागामार्फत कंपनीचे काम चालते. मागील आठवडयातच नवी दिल्ली येथे कंपनीच्या आपल्या पहिल्या मिटींगमध्ये सहभाग घेऊन आल्यामुळे कामाची माहिती अँड. बोरावके यांनी सांगितली. एकूण १२ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. त्यात सहा संचालक हे कंपनीच्या विविध विभागांवर काम करणारे उच्चस्तरीय अधिकारी आहेत. त्याशिवाय केंद्रसरकारच्या फायनान्स खात्याचे सेकेटरी व टेलीकॉम मंत्रालयाचे सेक्रेटरी असे दोन सदस्य आहेत.या प्रमाणे शासनाच्या सेवेतील आठ अधिकारी आहेत.चार संचालक देशातील वेगवेगळ्या भागातील निवडले आहेत.त्यात दिव- दमन येथील तृप्ती पटेल’ या महिला सदस्या आहेत उत्तर प्रदेश मधून मनोज चौधरी’ हे मेडिकल व्यवसायिक आहेत. आसाम मणिपुर येथिल सिकोजाम किपगेम’ हे शिक्षण क्षेत्रातील सदस्य आहेत. महाराष्ट्रातून अॅड.रविंद्र बोरावके असे १२ संचालक आहेत. मध्यंतरीच्या २००४ ते २०१४ या दहावर्षाच्या कालावधीत सर्धेच्या युगात २७ स्पेक्ट्रच्या घोटाळयामुळे व नवीन तोरज्ञान स्वीकारण्यास उशीर झाल्यामुळे कंपनीची सेवा इतर कंपन्यांच्या तुलनेत मागे पडली. परंतू आता पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात नवीन योजना आखल्या जात आहेत. घरगुती टेलीफोन सुध्दा उपमहाव्दारे जोडणी केली जाणार आहे त्यामुळे येत्या काही महिन्यातच पुर्वीप्रमाणेच परापरात टेलीफोनची पंरा वाजू लागेल, व येत्या काही दिवसात कंपनी स्पर्धेत सर्वात पुढे आलेली दिसेल, असा विश्वासही बोरावके यांनी व्यक्त केला. संपुर्ण देशातून आम्हा चौधा सदस्यांची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. त्याबद्दल आधार मानले. त्यांनी दाखविलेला विश्वास व जबाबदारी पुर्ण निष्टेने व प्रामाणिकपणे पार पाडील अशी ग्वाही अॅड. रविकाका बोरावके यांनी व्यक्त केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *