पाणी प्रश्न व शहर विकासाच्या योजना मार्गी लावणे हाच माझा एकमेव उद्देश:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराची पाणी समस्या
कायमस्वरूपी दुर करण्याची सर्वच राजकिय नेते व नागरिकांची इच्छा आहे. त्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्नशील आहेत.वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या करदात्यांना पाणी प्रश्न लवकर सुटावा अशीच अपेक्षा आहे.विविध राजकिय पक्ष व राजकिय नेते यांच्यात सुरू असलेला संघर्ष,वादविवाद, आरोपप्रत्यारोप याच्याशी जनतेला काही एक देणेघेणे नाही.
सध्या 5 नं. साठवण तलाव,120 कोटी रु. च्या योजनेला मिळालेली तांत्रिक मान्यता आणि निळवंडे पाणी आरक्षण यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण(MJP) ने कोपरगाव नगरपरिषदेला घातलेली अट याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने अशी अट घालण्याची गरजच नव्हती.खरे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून फक्त
तांत्रिक मान्यतेची अपेक्षा होती. पाणी किती ठिकाणांहून घ्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोपरगाव नगरपरिषद सभागृहाचा आहे.मी लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन कोपरगावसाठी नांदूरमध्यमेश्वर व निळवंडे येथून मंजुर असलेले पाणी मिळालेच पाहिजे असा ठराव मांडणार आहे.सर्वच नगरसेवक हा ठराव बहुमताने मान्य करतील यात शंकाच नाही.भविष्यातही शहरासाठी पाणी कमी पडू नये यासाठी दोन्ही ठिकाणचे पाणी आरक्षण अतिशय महत्वाचे आहे.
आता तर साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोषजी काळेच असल्याने ते या दोन्ही पाणी पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्यच करतील अशी मला पुर्णपणे खात्री आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी व संबंधित विभागाचे अधिकारी या कामांचा सतत पाठपुरावा करत आहे. नांदूरमध्यमेश्वर मधून आपले 5.96 द.ल.घ.मी. पाणी आरक्षण 2036 पर्यंत आहे.त्यांनतर ते वाढवून 7.22 द.ल.घ.मी.पाणी मिळावे अशीही मागणी केलेली आहे.
माझ्यासह सर्वच राजकिय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आता एकच पथ्य पाळणे आवश्यक आहे.पाणी या विषयावर कुणीही एकमेकांवर आरोप करणे जनतेलाही मान्य नाही.श्रेय कुणीही घ्या पण आम्हाला नियमित पाणी द्या जनतेचे हेच मागणे आहे.वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणी प्रश्न हा सर्वांच्या सहकार्यानेच सुटू शकतो. पाणी प्रश्नावर आरोप प्रत्यारोप,मुलाखती,कमेंट्स यातून फक्त करमणूक होईल.
मी तरी कुणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही.श्रेय घेण्याच्या फंदात मी पडणार-पडतही नाही.पाणी प्रश्न व शहर विकासाच्या योजना मार्गी लावणे हाच माझा एकमेव उद्देश आहे.जनतेलाही माझ्याकडून तीच अपेक्षा आहे.सर्वांनी सहकार्य करावे हिच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *