
विध्यार्थ्यांना मिळणार रू ३ ते ५ लाख वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या…
कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग काॅलेज, फार्मसी काॅलेज, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज इत्यादी संस्थांमधिल ज्या विध्यार्थ्यांना अंतिम वर्षात असताना नोकरी पाहीजे, अशा प्रत्येक विध्यार्थ्याला संबंधित संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी अनेक धोरणांची अंमलबजावणी संजीवनीच्या व्यवस्थापना मार्फत केल्या जाते. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीच्या एमबीए विभागाने ओम लाॅजिस्टीक्स या प्रत्येक क्षेत्रातील दळणवळणात आघाडीच्या कंपनीबरोबर सामजस्य करार केला असुन या कंपनी मार्फत एमबीए च्या विध्यार्थ्यांना अधिकचे १०० तासांचे प्रशिक्षण देवुन त्यांची अंतिम वर्षात असतानाच रू ३ ते ५ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रात अनेक व्यवस्थापन शास्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांचेच. व्यवस्थापन कोलमडले असुन संजीवनी एमबीए मात्र ऑटोनॉमस संस्था असल्यामुळे विविध कंपन्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना केल्यामुळे ग्रामिण महाराष्ट्रात संजीवनी एमबीएने विध्यार्थ्यांना नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे. आता व्यवस्थापनाच्या पुढाकाराने डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर व एम.बी.ए. विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओम लाॅजिस्टिक्स या कंपनीबरोबर सामंजस्य करार केल्यामुळे संजीवनीच्या विध्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्यास अधिकची मदत होणार आहे.
सध्या परीस्थितीत व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरी मिळण्याची अपेक्षा असते. पालकही आपला पाल्यास नोकरी मिळुन तो स्थिर स्थावर व्हावा ही स्वप्ने डोळ्यात साठवुन पाल्यांसाठी तडजोड करीत असतात. अशा परीस्थितीत संजीवनीच्या एमबीए मध्ये शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवुन केवळ सुशिक्षित न करता त्यांना सुसंस्कृत करून नोकरदारही बनवित आहे व पालकांचे स्वप्नेही पुर्ण करीत आहे, असे श्री कोल्हे यांनी शेवटी म्हटले आहे.
माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी संजीवनी एमबीएने ओम लाॅजिस्टिक्स या कंपनीबरोबर केलेल्या कराराचे स्वागत केले आहे.
