कोपरगाव तालुक्यातील ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल, ‘निवडणूक वार्ता ’ गृहपत्रिकेत उपक्रमाविषयी माहिती…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगाव तालुक्यात डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीत तालुका प्रशासनाच्या वतीने नऊ ठिकाणी ‘गुलाबी मतदान केंद्र’ उभारण्यात आले होते. या उल्लेखनीय उपक्रमांची राज्य निवडणूक आयोगाच्या ‘निवडणूक वार्ता’ गृहपत्रिकेत दखल घेण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दर सहा महिन्यांनी ‘निवडणूक वार्ता’ ही गृहपत्रिका (न्यूज लेटर) प्रकाशित करण्यात येते. नुकत्याच प्रसिध्द […]

Read More

संजीवनी अकॅडमीची अनुश्री बनकरने सीबीएसई परीक्षेत ९८ . २० टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम:-डॉ. मनाली कोल्हे…

१०० टक्के निकाल, १७ विध्यार्थ्यांनी मिळविले ९० टक्यांपेक्षा अधिक गुण…कोपरगांव प्रतिनिधी:- केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनेशन-सीबीएसई) फेब्रुवारी फेब्रंवारी/मार्च २०२३ मध्ये इ.१० वीच्या परीक्षांचे निकाल काल जाहिर केले असुन त्यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या अनुश्री योगेश बनकर हीने ९८ . २० टक्के गुण मिळवुन कोपरगांव तालुक्यातील सर्व सीबाएसई पॅटर्नच्या […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम:- कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ. १० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बाजी मारत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. इ.१० वीत अथर्व बेरगळ आणि हर्ष कासलीवाल यांनी ९७ टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला तर तनिषा जैन हिने ९६.४ टक्के गुण […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उसतज्ञ सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक मेळाव्याचे १७ व १८ मे रोजी आयोजन केले असून सभासद शेतक-यांनी यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष रमेश घोडेराव, […]

Read More

महाराष्ट्रात निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्थेची आवश्यकता, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचा प्रस्ताव ; मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास विभागास कार्यवाहीच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-धार्मिक विधी(घरगुती/सार्वजनिक) नंतरचे निर्माल्य नदी,समुद्र, ओढे, नाले येथे विसर्जन केले जाते. घरगुती धार्मिक पुजा, सार्वजनिक धार्मिक स्थळांचे पुजा येथून फुले, पाने यांचे एकत्रितपणे निर्माल्य संकलन करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरावर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था आणि शास्रोक्त विल्हेवाट लावण्याची आवश्यकता आहे.याबाबत प्रस्ताव तयार करुन स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण विभागास […]

Read More

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्लायांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळीत्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समितीसदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीनेमुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी सत्‍कार केला.

Read More

संजीवनी अकॅडमीची इ. १० वीत अनुश्री बनकर ९८. २० टक्के मिळवुन सर्व प्रथम तर इ. १२ वीत ९४. १४ टक्के गुण मिळवुन पुर्वा कोठारी प्रथम:- डॉ. मनाली कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्कूलच्या दोनही वर्गांचा सीबीएसईचा निकाल १०० टक्केकोपरगांवःसंजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकडमीच्या इ.१० वी व इ. १२ वीच्या वर्गांचा सीबीएसईचा निकाल आज जाहिर झाला असुन यात इ.१० वीच्या अनुश्री योगेश बनकर ने ९८. २० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. तर इ.१२ वी (कॉमर्स) वर्गात पुर्वा सचिन कोठारी हिने […]

Read More

महापराक्रमी महाराज यशवंतराव होळकर यांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध पहिले महायुद्ध पुकारणाऱ्या श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांनी स्वतःच्या बळावर इंग्रजांना वेगवेगळ्या युद्धात तब्बल १८ वेळा पराभूत केले होते. अशा महापराक्रमी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा इतिहास व जीवनकार्य समाजासाठी स्फूर्तिदायक असून, तो इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्याची गरज आहे. तरुण पिढीने महाराज यशवंतराव होळकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यापासून […]

Read More

समता पतसंस्था व बँकांच्या कामकाजात आता काहीच फरक राहिला नाही:- काका कोयटे, चेअरमन…

क्यु.आर कोड द्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार करण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक…कोपरगाव प्रतिनिधी:- समता पतसंस्थेचे कामकाज गेली अनेक वर्ष अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे सुरू आहे. मोबाईल बँकिंग, व्हावचरलेस बँकिंग, पेपरलेस बँकिंग, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, कॉल सेंटर या प्रणालीमुळे समता बँकिंग क्षेत्रात अग्रेसर आहे. त्या तंत्रज्ञानातील यु.पी.आय. प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा ही सेवा […]

Read More

पोलीस भरतीत एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश प्राप्त केले आहे. यात सेंट्रल कस्टम एक्साईजमध्ये पवन सुनील शिरसाट या विद्यार्थ्याला कॉन्स्टेबलपदी नियुक्ती मिळाली आहे.तर रेश्मा रमजान शेख,अरबाज इब्राहिम शेख, अमोल शंकर थोरात, अनंत बबन पवार या विद्यार्थ्यांना पोलीसपदी नियुक्ती मिळाली आहे. तसेच, गणेश सुनील वादगे या विद्यार्थ्यांची इंडियन […]

Read More