कोपरगाव मतदार संघ विकासात जिल्ह्यात अग्रेसर राहील:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे निधी मिळविण्यासाठी प्रेरणा मिळत असून आजपर्यंत २१०० कोटीच्या वर निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहावा यासाठी प्रयत्नशील असून तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी ठेवा कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहील अशी ग्वाही […]

Read More

सामाजिक न्याय विभागाकडून कोपरगाव मतदारसंघातील५१ रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती सरकारने दखल घेवून सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील ५१ रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आजपर्यंत […]

Read More

के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी नाशिक पदवीधर शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कोपरगांव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार मा. आशुतोष काळे, कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, संस्थेचे […]

Read More

ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील संवत्सर येथील ज्ञानदेव उर्फ माउली कचरू गायकवाड (६९) यांचे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. संवत्सर पोष्ट ऑफिसचे अधिकारी व जय जनार्दन फोटोचे दत्तात्रय गायकवाड यांचे ते वडील होत. कै. ज्ञानदेव गायकवाड यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलताताई […]

Read More

कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील रिक्त पदे भरा -स्नेहलताताई कोल्हे “पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला यांच्याकडे सौ.कोल्हे यांची मागणी…”

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस बळ अपुरे असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात रिक्त असलेली एकूण २५ पदे भरण्यासाठी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यामध्ये आपण वैयक्तिक […]

Read More

ब्राह्मणगाव व परिसरातील गावांच्या विजेच्या समस्या कायमच्या सूटणार:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विजेच्या समस्यांमुळे वीज ग्राहकांना होणारा त्रास दूर होवून पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा यसाठी रवंदे, वारी, या सबस्टेशनची क्षमता वाढवून कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी, पोहेगाव, चास नळी हि सबस्टेशन शहा येथील १३२ के.व्ही.ए. सबस्टेशनला जोडली जाणार आहेत. तसेच ब्राम्हणगाव व परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी ब्राम्हणगाव सबस्टेशनसाठी ३ कोटी […]

Read More

मा.आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त के. बी. पी. विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांना आ.आशुतोष काळेंच्या हस्ते स्कूल बॅग भेट….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मा. आ.अशोकराव काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विद्यालयातील ७५ गरजू विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते स्कूल बॅग भेट देण्यात आली. या ७५ स्कूल बॅग साठी सुनील बोरा, डॉ. तुषार गलांडे, अमोलजी आढाव यांनी […]

Read More

कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्याशांतता समितीच्या बैठकीत आ.आशुतोष काळेंचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्व समाजाचे व विविध जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने व एकोप्याने राहत आहेत. हाच जातीय सलोखा आपल्याला यापुढे देखील टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोपरगाव तालुक्याची शांतता भंग होणार नाही काळजी घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत […]

Read More

कोपरगाव शहराच्या विकासासाठी १० कोटी निधी मंजूर:- आ.आशुतोष काळे…

व्यापारी संकुल, विविध रस्ते, समाज मंदिर, शहर सुशोभिकरणासह हद्दवाढ भागातील विकास होणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास होवून शहरातील नागरिकांच्या मुलभूत विकासाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दिलेले वचन पूर्ण करतांना कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल १३१.२४ कोटी देऊन शहर विकासाला देखील आजपर्यंत ३५ कोटीचा निधी देवून कोपरगाव शहराचा चेहरा […]

Read More

संजीवनी सैनिकी शाळेत चंद्रयान ३ मोहिमेचे जल्लोषात स्वागत, विध्यार्थ्यांनी अनुभवले प्रत्यक्ष सॉॅफ्टलॅडिंगचे प्रक्षेपण…

कोपरगांव प्रतिनिधी: बुधवारी सायंकाळी भारतीय क्षितिजावर सुर्य मावळत असताना कोट्यावधी भारतीयांचे डोळे चंद्रावर खिळलेले होते. जगभरातील अब्जावधी लोकांना ज्याची प्रतिक्षा होती तो सुवर्णक्षण अवतरला. या सुवर्णक्षणाची संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कॅडेट्सही मोठ्या उत्कंठेने वाट पहात होते. चंद्रयान ३ च्या विक्रम लॅन्डरचे बुधवारी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉॅफ्टलॅडिंग झाले. या संपुर्ण […]

Read More