जाणता राजा प्रतिष्ठानचा “समाजरत्न” पुरस्कार स्वच्छतादूत व वृक्षप्रेमी सुशांत घोडके यांना जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-जाणता राजा प्रतिष्ठान,भानसहिवरा ता.नेवासा वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना “समाजरत्न” पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी केली आहे. जाणता राजा प्रतिष्ठानने अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय व दिशादर्शक कामगिरी करणाऱ्या १५ व्यक्तींची प्रोत्साहन म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वच्छता,जलशक्ती, […]

Read More

अजून किती सहकार्य करायचे?:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेच्या मनाई येथील स्लॉटर हाऊसला (कत्तलखाना) प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळविण्यासाठी मी स्वतः कसाई-कुरेशी समाजाचे शिष्टमंडळासह अहमदनगर कार्यालयात गेलो, प्रयत्नपूर्वक मान्यताही मिळविली. सुमारे 1 कोटी रूपये खर्च करून बांधून पडलेले स्लॉटर हाऊस दुरुस्त करून घेतले, मशिनरी सुरू करून घेतल्या, रंगरंगोटी – स्वच्छता करून फक्त म्हैसवर्गीय जनावरांचे स्लॉटर हाऊस सुरू करून दिले. सर्वच […]

Read More

साखर कारखान्यांनी उपपदार्थ, औषध, बायोगॅस निर्मितीसाठी भर द्यावा तरच कारखानदारी तग धरु शकेल:- माजी मंत्री शंकरराव कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- राज्यात १८१ साखर कारखाने असुन त्यापैकी फक्त २५ साखर कारखाने सुस्थीतीत आहे अन्य कारखान्यांची स्थिती हलाखीची आहे, दिवसेंदिवस साखर साठवणुकीचा प्रति पोते खर्च वाढत आहे, व्याजाचे बोजे वाढत आहे, बाझीलमध्ये १७ टक्के साखर उतारा मिळतो. त्यामुळे तेथे साखर उद्योगातील खर्चाचा ताळमेळ बसतो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याने सुद्धा जादा साखर उतारा देणाऱ्या ८६०३२ तसेच ११०१५ […]

Read More

शिर्डी तील दर्शन व्यवस्थेत तूर्तास बदल नाही:- जिल्हाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी): अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदीर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याठिकाणी दर्शन व्यवस्थेत केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहेत. अशी माहिती अहमदनगर चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भोसले यांनी […]

Read More

उत्राणे ग्रामपंचायत येथे शासकीय कागदपत्रे तयार करून देण्याचे शिबीर संपन्न झाले…

कोपरगाव प्रतिनिधी:- (सटाणा/नामपूर) :- उत्राणे ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद असून समाजातील शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध कार्यक्रम नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजय चव्हाण यांनी केले आहे. पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत उत्राणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप आहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्राणे येथे शासकीय कागदपत्रे काढून […]

Read More

चासनळीचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल, दसऱ्याचा साधला मुहूर्त..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- आ. आशुतोष काळे यांचा मतदार संघात सुरु असलेला विकासाचा झंझावत व त्यांची काम करण्याची कार्यपद्धती पाहून अनेक पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु असून चासनळी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी (दि.१५) रोजी दसऱ्याचा मुहूर्त साधत माजी आ.अशोकराव काळे यांच्या […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु:- राहुल रोहमारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना २०१४ पासून बंद होती. तत्पूर्वी २०१४ पर्यंत माजी आमदार अशोकराव काळे यानी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून हि योजना चालविली. मात्र २०१४ पासून हि योजना बंद होती. परंतु आ. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१०४८३ झाल्या असुन १४७१३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४३९४ आहे तर उपचार सुरू असलेले ९५ आहे व मयत झालेले २२४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ ऑक्टोबर २०२१ आज ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४०४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कायदे विषयक जनजागृतीचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा:- अँड.नितीन पोळ….

कोपरगाव प्रतिनीधी:-विधी सेवा समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक जण जागृतीचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा असे प्रतिपादन कोपरगाव वकील संघाचे सदस्य अँड नितीन पोळ यांनी केलेदेशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिना निमित्ताने “७५ वी आझादी का अमृत” या कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात […]

Read More

वाढदिवसानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांचा नेत्रदानाचा संकल्प…

मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा…कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा ७४ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नाशिक येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी नेत्रदान शिबीर, रुग्णवाहिका लोकार्पण, अंध बांधवाना साहित्याचे वाटप, पुस्तक व वेबसाईटचे प्रकाशन यासह विविध कार्यक्रम पार पडले.मंत्री […]

Read More