कायदे विषयक जनजागृतीचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घ्यावा:- अँड.नितीन पोळ….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
विधी सेवा समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक जण जागृतीचा सर्व सामान्य जनतेने लाभ घ्यावा असे प्रतिपादन कोपरगाव वकील संघाचे सदस्य अँड नितीन पोळ यांनी केले
देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिना निमित्ताने “७५ वी आझादी का अमृत” या कार्यक्रमाचे १३ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने अंचलगाव, खिर्डी गणेश,बोलकी येथे आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी बोलताना अँड. नितीन पोळ म्हणाले की सर्व सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते मात्र योग्य वेळी योग्य सल्ला व मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक सर्वसामान्य नागरिक न्यायापासून वंचित राहतात मात्र या निमित्ताने गावोगावी जाऊन कायदेविषयक जनजागृती करण्यात येत असून विधी सेवा समिती ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार असून न्यायापासून वंचित राहण्यापेक्षा या शिबिराचा लाभ घ्यावा
या वेळी कोपरगाव वकील संघाचे अँड. पाईक,अँड.नागरे,अँड. मोकळ यांनी विविध कायद्यांची माहिती दिली
या वेळी विश्वासराव महाले,साहेबराव रोहम,सोपान चांदर
उमेश शिंदे,ग्रामसेवक बागुल तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *