भर पावसात आ.आशुतोष काळे शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला धीर ; सर्वच मंडलात ६५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस सरसकट पंचनामे करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले.काढणीला आलेल्या सोयाबीन,बाजरी,कापूस,मका,तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या […]

Read More

सोमैया महाविद्यालयाचा प्रफुल्ल कुमावतचे एमपीएससी परीक्षेत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा गणित विभागाचा माजी विद्यार्थी प्रफुल्ल रजनी संजय कुमावत याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. प्रफुल्ल संजय कुमावत हा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या गणित विभागाचा विद्यार्थी असून विशेष कौतुकाची […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना ऊस भावात मागे राहणार नाही ; सहकारात देशात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचा बायो सीएनजी प्रकल्प सुरू,विमानांना लागणा-या इंधन निर्मीतीची संजीवनीत चाचपणी करणार:- विवेकभैय्या कोल्हे….

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी साखर उद्योगासमोर दिवसेंदिवस विविध संकट निर्माण होत आहेत. केंद्र व राज्य शासन त्यासाठी सहकार्य करत आहे, बदलत्या परिस्थितीत निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्यांसाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जी दिशा दाखविली त्यावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व सभासद शेतक-यांच्या मार्गदर्शनांखाली काम सुरू असुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे […]

Read More

चाळीस वर्षात आमच्या स्विय्य सहाय्यकाने पोलिसांवर हल्ला केला नाही:- विवेकभैय्या कोल्हे…

आरोपी स्विय्य सहाय्यक आमदार काळे यांनी पोलिसांकडे हजर करावा,कोल्हे यांचे आवाहन ;गुन्हेगारांना पाठीशी घालून संस्कृती बिघडणारा आ.का. कोण ? विवेकभैय्या कोल्हे यांचा घनाघात…कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव मतदारसंघात सुरू असलेला गुन्हेगारीचा सुळसुळाट हा कोणत्या आ.का. च्या आशीर्वादाने सुरू आहे ? नुकतेच आमदार काळे यांच्या स्वीय सहाय्यकाने दगडफेक केल्यामुळे आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही […]

Read More

भविष्यात व्यवसाय वाढीच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार:- आ. आशुतोष काळे…

जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी संस्था जरी छोटी असली तरी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी हि संस्था प्राणपनाणे जपली.कापूस मिळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करून कोरुगेटेड बॉक्स तयार करण्याचा पर्यायी व्यवसाय सुरु केला तो व्यवसाय जोरात सुरु आहे.हाच आदर्श घेवून भविष्यात व्यवसाय वाढीच्या दृष्टीने वाटचाल […]

Read More

पत्रकारांवरील हल्ल्याचा कोपरगावात निवेदन देत निषेध, राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिले निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने […]

Read More

स्वदेशी आयुर्वेदाचा समजून सदुपयोग करा:- राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड…

कोपरगांवात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे आयोजन…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय ऋषी-मुनींनी विकसित केलेले आयुर्वेद शास्र मनुष्याचा निरोगी आयुर्मानासाठी महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वदेशी आयुर्वेदाचा समजून सदुपयोग करावा. असे आवाहन राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी एका व्याख्यानात सांगितले.कोपरगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयात सूर्यतेज संस्था, महाविद्यालय आरोग्य समिती, वसतिगृह समिती यांचे वतीने १० व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद […]

Read More

आत्मा मालिक मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद सेमिनारचे आयोजन…

कोपरगांव प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन अनुदानित आयुर्वेद युनानी महाविद्यालयीन अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत एनसीआयएसएम नवी दिल्ली, आयुष्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, आणि एमसीआयएम मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी आत्मा मालिक ध्यानपीठ येथे “आयुर्वेद युनानी: सिनर्जिस्टिक सायन्स फॉर हॉलिस्टिक हेल्थ” या विषयावर राष्ट्रीय सेमिनार २०२५ चे आयोजन […]

Read More

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असल्याने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाला बदलत्या परिस्थीतीत थेट शेतकऱ्यांना घरपोहोच सेवा देऊन काळानुरूप पावले टाकावे लागतील असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्याच्या प्रगतीत सातत्याने भर घालावी लागेल असेही ते म्हणाले.सहकाररत्न शंकरराव कोल्हे कोल्हे शेतकरी सहकारी संघाची ८९ वी वार्षिक सर्वसाधारण […]

Read More

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या नियामक मंडळाच्या सचिवपदी डॉ. प्रशांत बोडके यांची निवड..

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत उत्साहात संपन्न झाली. यावेळी झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके यांची नियामक मंडळाचे सचिव म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली.या सचिवपदाचा कालावधी सन 2026 ते 2031 या पाच […]

Read More