सोमैया महाविद्यालयाचा प्रफुल्ल कुमावतचे एमपीएससी परीक्षेत यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाचा गणित विभागाचा माजी विद्यार्थी प्रफुल्ल रजनी संजय कुमावत याची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली. प्रफुल्ल संजय कुमावत हा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या गणित विभागाचा विद्यार्थी असून विशेष कौतुकाची बाब म्हणजे कुमावत यांची एकाच वेळेस कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक या दोन्ही परीक्षांमध्ये निवड झाली आहे. याशिवाय पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी देखील मैदानी परीक्षेसाठी ते पात्र ठरले आहेत. जिद्द, चिकाटी व सातत्य या त्रिसूत्रीचा वापर करून हे यश त्याने संपादित केले. स्पर्धा परीक्षेत गणित हा विषय घेतल्याने ही परीक्षा उत्तीर्ण करने सुलभ झाल्याचे त्याने म्हटले. प्रफुल्ल यास गणित विभागप्रमुख डॉ. बी. डी. गव्हाणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.व्ही. एस. साळुंके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने प्रफुल्लचा यथोचित सत्कार ही करण्यात आला. त्याने प्राप्त केलेल्या नैपुण्याबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *