अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये चिकण मातीच्या कणांचे महत्व अनन्यसाधारण:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-चिकण मातीच्या कणांमुळे मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते तसेच रासायनीक खतांचा कार्यक्षमपणे वापर होतो. त्याचबरोबर मातीमधील प्रदुषण थांबविणे शक्य होते. पिकांच्या उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्ये आवश्यक असतात. चिकण मातीच्या कणांमुळे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन योग्य रितीने होते. अशा प्रकारे चिकण मातीच्या कणांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.महात्मा […]

Read More

जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सोमैया महाविद्यालयाचे घवघवीत यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोनई फार्मसी महाविद्यालय, सोनई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले आहे. तसेच मुलांच्या संघाने देखील उपविजेतेपद मिळविले आहे. त्याच बरोबर या स्पर्धेमधून तीन विद्यार्थिनी खेळाडू व दोन विद्यार्थी खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक […]

Read More

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरीव मदत मिळावी :- स्नेहलताताई कोल्हे…

घरगुती साहित्य खराब झाल्याने बांधकाम कामगार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तातडीने मदत पोहचवा :- कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघासह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कोपरगाव तालुक्यातील नदी, ओढे, नाले यांना पाण्याचा ओघ वाढला असून अनेक गावांमध्ये नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या घरामध्येही पाणी घुसले आहे. संसारोपयोगी साहित्य खराब […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५४ वी मा.वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या नुकतीच उत्साहात सपंन्न झाली. यावेळी प्रथमतः स्वर्गीय शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच हस्ते पुजन करण्यात येवून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. सभेच्या अध्यक्षपदाची सूचना अशोक मुरलीधर काळे यांनी मांडली सदर सूचनेस मच्छिंद्र रोहमारे […]

Read More

कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्णकरण्याच्या दृष्टीने आ.आशुतोष काळेंचे अजून एक पाऊल पुढे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यासह कोपरगाव शहराच्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव सबस्टेशनवरचा भार कमी करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. आता त्यापुढे जावून कोपरगाव तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याबाबत नुकतीच त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून या बैठकीत कोपरगाव शहरात महावितरणचे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याबाबत महत्वपूर्ण […]

Read More

गोदावरी खोरे दूध संघ लवकरच अत्याधुनिकविस्तारीत प्रकल्पाची उभारणी करणार:- परजणे…

गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर…कोपरगांव प्रतिनिधी:-भविष्यातली दुग्धव्यवसायाची गरज विचारात घेऊन गोदावरी दूध संघ एकशे अकरा कोटीच्या अत्याधुनिक विस्तारीत प्रकल्पाची उभारणी करणार असल्याची माहिती गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली. या विस्तारीत प्रकल्पासाठी सभेत सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला.गोदावरी […]

Read More

आयुर्वेद हे प्रगल्भ शास्त्र :- आमदार डॉक्टर संजय कुटे…

कोपरगाव प्रतिनिधी(कोकमठाण):- आजच्या जगाला आयुर्वेदाचे महत्व पटले असून सर्व जग आयुर्वेदाकडे वळले आहे. सध्या मनाची अशांतता दूर करण्यासाठी दोन पर्याय असून ते म्हणजे “अध्यात्म व आयुर्वेद”. आजच्या जीवनशैलीमुळे तयार झालेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच आयुर्वेद हे समग्र व प्रगल्भ असे शास्त्र आहे, असे प्रतिपादन मा.आमदार डॉ.संजय […]

Read More

कोपरगाव मतदारसंघात अतिवृष्टीचे संकट कोल्हे कुटुंबाचा सेवा हाच धर्म…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदारसंघात आलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरले उभी पिक पाण्याखाली गेली आणि स्वप्न मातीमोल झाले.अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांची अन्नपाण्याची गैरसोय झाली होती.या परिस्थितीची माहिती घेत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे ओढवलेले हे संकट दुर्दैवी असून शेतकरी आणि नागरिकांना झालेले […]

Read More

सब-ज्युनिअर हॉकी संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघउप-विजेता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे २५ व २६ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करताना गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने संपूर्ण […]

Read More

जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये गौतम सहकारी बँक ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ ;जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनकडून गौतम बँकेला एकाच वेळी तीन पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गौतम सहकारी बँकेने बँकेचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने उत्कृष्ट कार्यभार करून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार पटकाविले असून यामध्ये अजून एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे. अहिल्यानगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मर्यादित.,अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ हा पुरस्कार मिळवत […]

Read More