कोपरगाव मतदार संघातील तीर्थक्षेत्र विकासासाठी पुन्हा २.५० कोटी निधी मंजूर:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकासासाठी निधी मिळावा यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून देवस्थानांना पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून २ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाची पौराणिक व ऐतिहासिक अशी वेगळी ओळख आहे. मतदार संघामध्ये अनेक […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकचे ४० अभियंते मायडियात:- श्री. अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-मागील महिन्यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने मायडिया इंडिया प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांच्या घेतलेल्या परीसर मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात या कंपनीने तब्बल ४० नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. हे सर्व विध्यार्थी ग्रामिण भागातील असुन संजीवनीच्या प्रयत्नामुळे तसेच विध्यार्थी व त्यांच्या पालकांनी दिलेल्या […]

Read More

कैलासगिरी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप भाकरे यांची निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील कान्हेगाव येथील कैलासगिरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे प्रकाश किसन भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप खंडेराव भाकरे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर लेखा परिक्षक राजकमल गांगुर्डे होते.याप्रसंगी संचालक सर्वश्री. रामदास वादे, श्रीरंग सिनगर, संतोष काजळे, लताबाई सिनगर, दत्तात्रय मढवई, सुशिलाबाई सिनगर, […]

Read More

कोपरगावांत सर्वरोग तपासणी शिबीर संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरातील रूग्णांच्या सोयीसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या सहकायनि जिजामाता उद्यान येथे बुधवारी मोफत नेत्रतपासणी मोतीबिंदु शस्त्रकिया व सर्वरोग तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले त्याचे उद्घाटन वैभव आढाव व गोपीनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यांत आले.प्रारंभी डॉ. योगेश बत्रा यांनी प्रास्तविकात आरोग्य शिबीराविषयी माहिती दिली. भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी […]

Read More

संजीवनी एमबीए मध्ये अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम:- श्री अमितदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्स संचलीत एमबीए महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट (शेती व्यवसाय व्यवस्थापन) हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठाने संजीवनी एमबीए ही (ऑटोनॉमस ) स्वायत्त संस्था असल्याने तशी परवानगीही दिली आहे. माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे संस्थापक कै. शंकरराव कोल्हे यांची […]

Read More

वडगाव शनेश्वर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे सुभाष कांगणे तर उपाध्यक्षपदी दौलत सोनवणे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील वडगाव येथील शनेश्वर सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे सुभाष बारकु कांगणे तर उपाध्यक्षपदी दौलत बाबुराव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले.या सोसायटीत कोल्हे गटाचे स्पष्ट बहु‌मत आहे. या निवडीप्रसंगी संचालक सर्वश्री विश्वनाथ बारगळ, […]

Read More

समता नगर व परिसरातील रस्त्यांवर खड्डे बुजवा राष्ट्रवादीची कोपरगाव नगरपालिकेकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील समतानगर व परिसरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे या खराब रस्त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मुरूम टाकून या रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावे अशा आशयाचे निवेदन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नामदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी […]

Read More

शिलेदारवाडी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे भरत शिलेदार व्हा. चेअरमनपदी प्रितम मेहेत्रे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील शिलेदारवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे भरत बबनराव शिलेदार व व्हा. चेअरमनपदी प्रितम बाबासाहेब मेहेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मागील महिन्यात शिलेदारवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वच्या सर्व १३ जागांपैकी ११ जागा काळे गटाच्या निवडून आल्या असून […]

Read More

संगमनेर उपविभागात ३१६९ शेतकऱ्यांचे १३४०४ हेक्टर पोटखराब शेती क्षेत्र ‘लागवडीलायक’:- संगमनेर उपव‍िभागीय अध‍िकारी डॉ. शंश‍िकांत मंगरुळे…

विशेष मोहीमेत सातबारा नोंदीत संगमनेर उपविभाग जिल्ह्यात अव्वल…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- लागवडीखाली आणण्यात आलेल्या पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारा नोंद घेण्यासाठी संगमनेर उपव‍िभागात ड‍िसेबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या तीन मह‍िन्यात व‍िशेष मोहीम राबव‍िण्यात आली. या मोहीमेत ३१६९ शेतकऱ्यांच्या १३४०४.५१ हेक्टर पोटखराब शेतीक्षेत्राची सातबारा उतारावर लागवडीलायक अशी नोंद घेण्यात आली आहे. या व‍िशेष कामग‍िरीत संगमेनर अहमदनगर ज‍िल्ह्यात अव्वल […]

Read More

कैलासगिरी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रकाश भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप भाकरे यांची निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील कान्हेगाव येथील कैलासगिरी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे प्रकाश किसन भाकरे तर उपाध्यक्षपदी प्रदिप खंडेराव भाकरे यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर लेखा परिक्षक राजकमल गांगुर्डे होते.याप्रसंगी संचालक सर्वश्री. रामदास वादे, श्रीरंग सिनगर, संतोष काजळे, लताबाई सिनगर, दत्तात्रय मढवई, सुशिलाबाई सिनगर, […]

Read More