नाभिक समाजात आणखी एक मानाचा तुरा, ह.भ.प. राहुल साळुंके यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्त पदी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक समाजाचे भुषणह.भ.प. राहुल साईनाथ साळुंके डुबेरकर रा.मुरलीधर नगर पाथर्डी फाटा नाशिक यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर च्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व नाभिक समाजाचे वतीने हार्दिक अभिनंदन.तसे पत्र धर्मादाय उप आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी नुकतेच दिले आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त […]

Read More

कोपरगावच्या इतिहासात प्रथमच वृत्तपत्र विक्रेत्यांचा विशेष सन्मान समता परिषदेने घेतली कार्याची दखल…

कोपरगाव प्रतिनिधी – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब हे नेहमीच समाजातील प्रत्येक घटकांच्याउन्नतीसाठी अहोरात्र आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून कार्य करत असतात तसेच तळागाळातील काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार करत, त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांचा योग्य तो सन्मान करत त्यांचा न्याय हक्कांसाठी प्रयत्नशील असतात. तसेच लोकशाही मधील महत्वाचा घटक असल्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न […]

Read More

अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात वाचन-प्रेरणा व हात धुवा दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १५आॕक्टोंबर माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॕ.अब्दुल कलाम यांची जयंती हा वाचन-प्रेरणा दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला.श्री.गो.विदयालयात भारतरत्न माजी राष्ट्रपती डाॕ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्यु.सोसायटीचे सचिव श्री.दीलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी शिक्षण प्रक्रियेत वाचन प्रकल्पाचे महत्व सांगुन आजच्या तंत्रज्ञानामध्ये जो पुस्तक वाचेल […]

Read More

के.जे.सोमैय्या महाविद्यालयात अॅड. संजीव कुलकर्णी लिखित The Earth: Beginning of the End हा ग्रंथ-प्रकाशन समारंभ संपन्‍न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“जो पर्यंत आपण स्वतः हा मनावर घेत नाही तोपर्यंत पर्यावरणाचा –हास थांबणार नाही. आता आपण पोथ्यांची पूजा करण्याऐवजी अॅड. संजीव कुलकर्णी लिखित The Earth: Beginning of the End या पर्यावरणाशी संबंधित अभ्यासपूर्ण ग्रंथाचे वाचन व पूजा करण्याची गरज आहे. सध्या पर्यावरणाचा –हास इतक्या प्रचंड प्रमाणात झालेले आहे कि, त्यापाठीमागे कुठे तरी मोठे अर्थकारण व […]

Read More

“वाचनातून विचारशक्ती आणि विचारशक्तीतूनच आत्मविश्वास येतो”- डॉ. हिरालाल महानुभव…

कोपरगाव प्रतिनिधी:- “वाचनातून विचारशक्ती प्राप्त होते आणि ही विचारशक्तीच माणसाला घडविणारा आत्मविश्वास निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन करावं, विचारांची शक्ती प्राप्त करावी; म्हणजे भविष्यात पदवीनंतर आपण कोण? हे ठरवावेच लागणार नाही. पद व रोजगार प्राप्त होऊन आपोआप व्यक्तिमत्व घडेल”, असे विचार प्रतिपादन कोपरगाव येथील म.सा.प.कोपरगावचे अध्यक्ष डॉ. हिरालाल महानुभव यांनी केले.येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ.अब्दुल […]

Read More

“स्कुल बस ला थांबे निश्चित करावे”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात अनेक खाजगी शाळेच्या स्कुल बस असून सकाळी व संध्याकाळी या स्कुल बस शहरातील मुलांना शाळेत घेऊन आणून सोडत असताना अचानक रस्त्यावर थांबून मुलांना उतरून देतात मात्र त्या मुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा व छोटे मोठे अपघात घडतात त्यामुळे पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने या स्कुल बस चे थांबे निश्चित करावे अशी मागणी लोक स्वराज्य […]

Read More

कोपरगावच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचा सार्थ अभिमान:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कोपरगावच्या शिवसैनिकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या चौकशीत चुकीचे काहीही निष्पन्न झाले नाही. यातून कोपरगावचे शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत असून महाविकास आघाडीचा घटक या नात्याने पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कोपरगावच्या शिवसैनिकांचा सार्थ अभिमान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.शिवसेना पक्षात पडलेल्या […]

Read More

‘दिवाळी हाट’ खरेदी साठी सुवर्ण संधी:- सौ. पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- येणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी असणाऱ्या वस्तूंची स्थानिक महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ‘दिवाळी हाट’ सुवर्णसंधी असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील स्थानिक महिला बचत गट व […]

Read More

उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही:- जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी-मुंबई वांद्रे परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रे सापडल्या प्रकरणी कोपरगाव शहरात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तीन दिवसांपासून ठाण मांडून बसले होते. त्यांनी तीन दिवसात २०० प्रतिज्ञापत्रांची पडताळणी केली असून त्यात एकही प्रतिज्ञापत्र आक्षेपार्ह नसल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली आहे.सर्व शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिज्ञापत्र उद्धव साहेबांचे समर्थनार्थ करून […]

Read More