नाभिक समाजात आणखी एक मानाचा तुरा, ह.भ.प. राहुल साळुंके यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्त पदी निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक समाजाचे भुषण
ह.भ.प. राहुल साईनाथ साळुंके डुबेरकर रा.मुरलीधर नगर पाथर्डी फाटा नाशिक यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर च्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व नाभिक समाजाचे वतीने हार्दिक अभिनंदन.तसे पत्र धर्मादाय उप आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांनी नुकतेच दिले आहे. श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्त म्हणून निवड होणे ही आपल्या समाजाला अभिमानास्पद आहे तसेच राहुल महाराज यांच्या कडून वारकरी, तसेच देवस्थानची व समाजाची खूप खूप सेवा घडावी.पूनश्च एकदा तूमच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शूभेच्छूक:- रमेश बिडवे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ नाशिक जिल्हा व सर्व पदाधिकारी, समाज बांधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *