आपल्या माणसांनी आपल्या माणसांचा केलेला सन्मान कौतुकास्पद:- सचिन सूर्यवंशी…

वारीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भूमीपुत्रांचा सन्मान…कोपरगाव प्रतिनिधी: आपल्या डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालेल्या विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवित उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तरुणांचा, ग्रामस्थांचा, आपल्याच गावातील थोरामोठ्यांनी केलेला यथोचीत सन्मान हा निश्चितच कौतुकास्पद असून गावातील पुढच्या पिढीस प्रेरणादायी ठरणारे कार्य असल्याचे गौरोद्गर कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी काढले.कोपरगाव तालुक्यातील वारी येथील भूमिपुत्रांनी […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा बेसबॉल संघ जिल्ह्यात प्रथम, संजीवनीच्या अनेक बलस्थानांपैकी क्रीडा क्षेत्रही प्रबळ…

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा बेसबॉल संघ जिल्ह्यात प्रथम, संजीवनीच्या अनेक बलस्थानांपैकी क्रीडा क्षेत्रही प्रबळ… कोपरगांव प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आंतर महाविद्यालयीन या विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम विजेते पद जिंकून जिल्ह्यात बेसबॉल क्रीडा प्रकारामध्ये अव्वल असल्याचे सिध्द केले. […]

Read More

दोन वर्षानंतर गोदाकाठ महोत्सवातून बचत गटांना पुन्हा उभारी, गोदाकाठ महोत्सवाची सांगता…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोपरगाव येथे शुक्रवार (दि.६) पासून सुरु होवून सलग चार दिवस नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होवून जवळपास ७५ लाखाच्या आसपास उलाढाल झाली. त्यामुळे मागील दोन वर्ष आर्थिक अडचणीत सापडलेल्या बचत गटांना पुन्हा उभारी मिळाली असल्याचे प्रतिपादन गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक गौतम […]

Read More

रामदासीबाबांनी अलौकीक साधनेतुन चैतन्याचा ठेवा निर्माण केला:- दत्तगिरी…

कोपरगांव प्रतिनिधी:-ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी अलौकीक साधनेतुन कोकमठाण पंचकोशीत चैतन्याचा ठेवा निर्माण केला असे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे परमशिष्य, श्री जुना पंचदशनाम आखाडयाचे वैजापूर येथील प पू. दत्तगिरी महाराज यांनी केले.येथील श्रीक्षेत्र कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या तेहतिसाव्या पुण्यतिथीनिमीत्त किर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचा प्रारंभ सोमवारी हभप रामदास महाराज वाघ, हभप भागवतानंद महाराज यांच्या […]

Read More

काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-काकडी ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करा अशा सुचना भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दिल्या.तालुक्यातील काकडी ग्रामपंचायतीत सोमवारी राहाता वीज वितरण कंपनीचे उपअभियंता डी डी पाटील यांच्या समवेत वीजेच्या प्रश्नाबाबत बैठक घेण्यांत आली. याप्रसंगी मल्हारवाडी, डांगेवाडी, रांजणगांव देशमुख, बहादराबाद, मनेगांव येथील कार्यकर्ते उपस्थित होते.काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पुर्वा गुंजाळ यांनी प्रलंबित वीज समस्यांचा पाढा […]

Read More

गोदाकाठ महोत्सवाला तिसऱ्या दिवशीही नागरिकांची तोबा गर्दी, विविध खाद्य पदार्थांची चव चाखण्याचा आ. आशुतोष काळेंनाही आवरला नाही मोह…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनास हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मागील काही वर्षापासून कोपरगाव येथे सुरु झालेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ बनला आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरु झालेल्या २०२३ च्या गोदाकाठ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देखील नागरिकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.दरवर्षी आतुरतेने वाट पाहणाऱ्या कोपरगाव तालुक्यासह […]

Read More

गोदाकाठ महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, दोनच दिवसात ४० लाखाची झाली उलाढाल…

कोळपेवाडी वार्ताहर:- बचत गटाच्या महिलांना घरबसल्या छोटे-मोठे उद्योग सुरु करण्याची प्रेरणा देवून त्यांनी उत्पादित झालेल्या तयार मालाला हक्काची शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देवून या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्ट (प्रदर्शन) कोपरगाव येथे आयोजित करण्यात […]

Read More

कोपरगांव पोलिस स्टेशन मध्ये रेझिग डे सप्ताहाचे उत्साहाने आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. त्या दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस विभागाचा २ जानेवारी हा दिवस रेझिग डे म्हणून साजरा केला जातो.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ८ जानेवारी हा ‘रेझिंग डे’ सप्ताह म्हणून साजरा केला जात असून […]

Read More

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेत पत्रकार दिन उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनीधी:- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक “दर्पणकार” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधत कोपरगाव तालुक्यातील पत्रकाराचा गौरव सन्मान संस्थेच्या वतीने माजी पोलिस अधीक्षक के पी रोकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास रजिस्टार बापूसाहेब डांगे यांच्या […]

Read More

खेळामुळे जीवनाला शिस्त लागते:- श्री बिपीनदादा कोल्हे…

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय एरोबिक्स स्पर्धांचे उद्घाटन…कोपरगांव प्रतिनिधी:- खेळ हा जीवनाचा अविाभाज्य घटक असुन शालेय जीवनात कोणताही खेळ खेळल्यास त्या खेळाच्या हार जीत मधुन यश आणि अपयशही पचविण्याची सवय मनाला होते. कोणताही खेळ हा नियमानुसारच खेळला जातो, खेळात शिस्त पाळावीच लागते, त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातही शिस्त लागते, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व श्री […]

Read More